चार्जरचा रंग केवळ काळा किंवा पांढराच का असतो? (फोटो सौजन्य- pinterest)
आपल्याला एखादा स्मार्टफोन खेरदी करायचा असेल तर त्याचे अनेक रंग उपलब्ध असतात. पण स्मार्टफोन्सचा चार्जर केवळ काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचाच असतो. तुमच्या मनात देखील असा प्रश्न अनेक वेळा आला असेल की वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असणाऱ्या स्मार्टफोन्सच्या चार्जरचा रंग केवळ पांढरा किंवा काळाच का असतो?
वेगवेगळ्या स्मार्टफोनसाठी वेगवेगळ्या प्रकारचा चार्जर उपलब्ध असतो. चार्जरचे अनेक प्रकार देखील आहेत. जसे की, टाइप C, टाइप A आणि टाइप B. याशिवाय हल्ली बाजारात वायलेस चार्जर देखील मिळतात. पण या सर्व चार्जरचा रंग पांढरा किंवा काळाच असतो.
यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे चार्जरचा टिकाऊपणा आणि किंमत. चार्जरचा रंग काळा किंवा पांढरा असेल तर तो दिर्घकाळ टिकू शकतो.
इतर रंगांचे चार्जर तयार करण्याच्या तुलनेत पांढरा किंवा काळ्या रंगाचा चार्जर तयार करताना कंपन्यांना कमी खर्च येतो. रंगाचे चार्जर बनवण्यास सुरुवात झाली तर चार्जर बनवण्यासाठीचा खर्च वाढेल परिणामी चार्जरची किंमत देखील वाढेल.
यामागील दुसरं कारण म्हणजे, काळा रंग उत्सर्जक मानला जातो. काळ्या रंगाचे चार्जर इतर रंगाच्या तुलनेत अधिक उष्णता शोषून घेतात. त्यामुळे चार्जरची केबल गरम होत नाही.
सुरुवातीला कंपन्या केवळ काळ्या रंगाचे चार्जरच तयार करत होत्या, मात्र कालांतराने कंपन्यांनी पांढऱ्या रंगाचे चार्जर तयार करण्यास सुरुवात केली. पांढरा रंग बाह्य उष्णता चार्जरच्या आत प्रवेश करू देत नाही. त्यामुळे चार्जर कमी तापतो आणि जास्त काळ टिकतो.