आठवड्यातून एकदा तरी केस आणि नखे आवर्जून कापली जातात. केस वाढल्यानंतर केसांची शोभा पूर्णपणे निघून जाते. त्यामुळे सर्वच पुरुष दोन किंवा तीन आठवड्यातून एकदा तरी केस कापतात. याशिवाय नखे वाढल्यानंतर ती वेळीच कापली नाहीतर नखांमध्ये घाण जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे पोटाचे आरोग्य बिघडून जाते. पण केस किंवा नख कोणत्याही वेदना होत नाहीत. चला तर जाणून घेऊया यामागील कारण. (फोटो सौजन्य – istock)
केस किंवा नख कापताना वेदना का होत नाहीत? यागील कारण वाचून तुम्हाला सुद्धा बसेल आश्चर्यकारक धक्का

नखे आणि केस हे मृत पेशींपासून बनलेले असतात. त्यामुळे नख किंवा केस कापताना कोणत्याही वेदना होत नाहीत.

केस आणि नखे ज्या पेशींपासून बनवलेले असतात, त्यामध्ये केराटिन नावाचे प्रथिने आढळून येते. हे प्रथिने पूर्णपणे निर्जीव असल्यामुळे केस किंवा नख कापताना कोणत्याही वेदना जाणवत नाही.

नख त्वचेच्या अगदी जवळ असतात तर केस मुळांना चिकटलेले असतात. केसांच्या मुळांशी जिवंत पेशी असतात, त्यामुळे काहीवेळा केस कापताना वेदना जाण्यावण्याची शक्यता असते.

शरीरासाठी केराटिन अतिशय महत्वाचे मानले जाते. केराटिनची पातळी कमी झाल्यानंतर केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, याशिवाय नख तुटण्याची शक्यता असते.

शरीरात केराटिन कमतरतेचा परिणाम नखाच्या आरोग्यावर दिसून येतो. नख तुटणे किंवा नखांमध्ये पांढरा थर जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे आहारात प्रोटीन असलेले पदार्थ खावेत.






