गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही? भयंकर शापाशी जोडले गेले आहे कारण...
गणेशाला तुळस अर्पण न करण्याचं कारण म्हणजे गणेशाने तुळशीला दिलेला शाप. या शापामुळेच तुळशीला कधीही गणेशाच्या पूजेत अर्पण केले जात नाही आणि असे केल्यास ते अशुभ मानले जाते.
एका आख्यायिकेनुसार, एके दिवशी गणेशजी तपश्चर्या करत असताना देवी तुळस त्यांच्यावर मोहित झाली आणि तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली
तथापि श्रीगणेशांनी तिचा हा प्रस्ताव नाकारला आणि याचाच राग मनात घेत तुळशीच्या गणेशाला तुझे दोन लग्न होतील असा शाप दिला. यांनतर गणेशानेही तुळशीला तुझं लग्न एका असुराशी होईल असा शाप दिला
गणेशाचा हा शाप ऐकून देवी तुळस घाबरली आणि तिने लगेच गणेशाची माफी मागितली. यांनतर गणेशाने आशीर्वाद दिला की तू नेहमी भगवान विष्णू आणि भगवान कृष्ण यांना प्रिय असशील आणि कलियुगात जीवन आणि मोक्षाचे कारण ठरेल. पण गणेशाच्या पूजेत मात्र तिचा कधीही वापर केला जात नाही.
हेच कारण आहे की गणेशाच्या पूजेत कधीही तुळशीचा वापर केला जात नाही. गणपतीला तुळस अर्पण केल्यास ते अप्रसन्न होतात आणि त्यांची कृपा आपल्यावर होत नाही अशी मान्यता आहे.