विमानाची सावली जमिनीपर्यंत का पोहचत नाही? (फोटो सौजन्य - Gemini )
जर उडत्या विमानाला सावली असते तर सावली दिसून का येत नाही? असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडला असेल.
काहींनी उडत्या विमानाची सावली तेव्हा पाहिली असेल जेव्हा विमान जमिनीपासून काही फुटांवर उडत असतो. पण जेव्हा उंचीवर जातो तेव्हा ही सावली दिसेनासी होता.
मुळात, ती दिसेनासी होत नसून तिचा आकार वाढतो आणि आकार वाढल्यामुळे सावलीची स्पष्टता कमी होते. सावली धूसर झाल्याने ती मानवी डोळ्यांना सहसा पाहता येत नाही.
जर तुम्हाला ही सावली पाहायची असेल तर विमानाच्या खिडकीतून पाहता येईल, पण स्पष्टता उंचीवर अवलंबून आहे.
कधी कधी ढगांच्या अडथळ्यामुळे सावली जमिनीवर पोहचत नाही. पण त्या विमानाची सावली ढगांवर पडलेली स्पष्ट दिसून येते.