डाळिंब : डाळिंब नाश्त्याला खाणं आरोग्यदायी आहे. सकाळी नाश्त्याला डाळिंबाचं सेवन केल्याने रक्ताची कमतरता भरुन निघते. थंडीमुळे येणारा अशक्तपणा दूर होतो. त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी डाळिंब फायदेशीर आहे. डाळिंब सकाळी खाल्लं तर पचायला सोपे जाते.
सफरचंद : थंडीत सतत भूक लागते. जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर, नाश्त्याला सकाळी सफरचंद खावं. सफरचंदामध्ये फायबर जास्त असल्याने भूक कमी लागते.
खजूर : खजूरामुळे हिमोग्लोबिन वाढतं. थंडीमुळे त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या या खजूरामुळे कमी होतात.
चिकू : चिकूमध्ये असलेला नैसर्गिक गोडवा ऊर्जा वाढते.
आवळा : व्हिटॅमिन C जास्त प्रमाणात असल्याने सकाळी नाश्त्याला आवळा खाणं फायदेशीर आहे. यामुळे पचनाच्या संबंधित त्रास होत नाही तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.