फोटो सौजन्य: Freepik
रेडॉन वायू हा नैसर्गिकरित्या उद्भवणारा रेडियोऍक्टिव्ह घटक आहे जो घरं आणि इमारतींमध्ये असू शकतो. तुम्ही रेडॉन वायूच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
एस्बेस्टोस हे एक खनिज आहे जे बांधकाम कामात वापरले जाते. एस्बेस्टोस धुळीचे कण श्वास घेतल्याने आपल्या शरीरात जातात, ज्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो.
जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस फुफ्फुसाचा कर्करोग झाला असेल, तर हा आजार तुम्हालाही होण्याचा धोका थोडा जास्त आहे. याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांसोबत चर्चा करणे गरजेचे आहे.
आर्सेनिक, क्रोमियम आणि निकेल यासारख्या काही रसायनांमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळेच शक्यतो यांपासून जेवढे लांब राहता येईल तेवढे चांगले.
मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) आणि हिपॅटायटीस सी व्हायरस सारखे काही व्हायरस देखील फुफ्फुसाच्या कर्करोगाशी जोडलेले असतात. त्यामुळे दरवर्षी फुल्ल बॉडी चेक करणे गरजेचे आहे.