World Toilet Day 2025: टॉयलेट म्यूजियम तुम्ही पाहिलं आहे का? या ठिकाणी वसलंय, फोटो पाहूनच व्हाल थक्क
जपानची राजधानी टोकियो येथे हे टाॅयलेट म्यूजियम तयार करण्यात आले आहेत. याची खासियत म्हणजे, हे म्यूजियम पूप थीमवर बनवण्यात आले असून इथले अन्नपदार्थ देखील पूप डिजाईनमध्ये सर्व्ह केले जाते.
तुम्ही जेव्हा या संग्रहालयात प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला वाटेल की, तुम्ही एका टाॅयलेट सीटच्या आत प्रवेश करत आहात, कारण या संग्रहालयाचे प्रवेशद्वार देखील शौचालयाच्या सीटसारखे डिझाइन केलेले आहे.
हे संग्रहालय तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जाईल, जो इतर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला अनुभवता येणार नाही
या संग्रहालयात जाण्यासाठी तुम्हाला तिकिट खरेदी करावं लागेल. जपानमध्ये वसलेलं हे संग्रहालय पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे येतात.
भारतातही तुम्हाला टाॅयलेट म्यूजियम पाहायला मिळेल. ते भारताची राजधानी दिल्ली येथे बनवण्यात आले आहे. इथे प्राचीन काळापासून ते आजपर्यंतच्या टाॅयलेट पाॅटच्या उत्क्रांतीचे प्रदर्शन दाखवण्यात आले आहे. येथे, तुम्हाला २५०० ईसापूर्व ते आजपर्यंतचे अनोखे टाॅयलेट पाॅट्स पाहायला मिळतील.