पुढील आठवड्यात खुला होणार 'हा' तगडा आयपीओ; 13 नोव्हेंबरपासून पैसे गुंतवता येणार! (फोटो सौजन्य - iStock)
येत्या 13 नोव्हेंबर रोजी झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 259-273 रुपये प्रति शेअर ठरवण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्यात खुले होणार हे 10 नवीन आयपीओ; कंपन्या तब्बल 20000 कोटी रुपये उभारणार!
झिंका लॉजिस्टिक्स या कंपनीच्या आयपीओत एका लॉटमध्ये एकूण 54 शेअर्स असतील. हा आयपीओ एकूण 1114.72 कोटी रुपयांचा असेल. ही कंपनी एकूण 550 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर देणार आहे.
झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स ही कंपनी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ही कंपनी ट्रक इंडस्ट्रीमध्ये काम करते. या कंपनीची स्थापना 2015 साली झाली होती.
येत्या 21 नोव्हेंबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर लिस्ट होणार आहे. यशस्वी गुंतवणूकदारांना 19 नोव्हेंबर रोजी शेअर्सचे वाटले जातील.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)