बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार आि काँग्रेस पक्ष आकाश मोरेंची उमेदवारी मागे घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे (फोटो - सोशल मीडिया)
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 53 अर्ज हे वैध ठरले आहेत. यामध्ये काँग्रेस उमेदवार आकाश मोरे, धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले यांचा देखील समावेश आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा महायुतीकडून व्यक्त केली जात होती. शरद पवार गटाने उमेदवार देण्यास नकार दिल्याने काँग्रेसने अर्ज दाखल केला आहे. सुनेत्रा पवार यांनी स्वतः फोन केल्यानंतर देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवार दिला. यामुळे पार्थ पवार यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली.
हे देखील वाचा : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला; उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस
दरम्यान, बारामतीत उमेदवार देण्याचा निर्णय दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनी घेतल्याचे मानले जात आहे. त्यामुळे सपकाळ याविषयीची चर्चा करण्याची शक्यता आहे. तर थोड्यावेळापूर्वी माध्यमांशी बोलताना बारामतीसाठी पक्ष जो काही निर्णय घेईल तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका अद्यापही तळ्यातमळ्यात असल्याचे दिसते. पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असून दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.
पाच तासानंतर चित्र स्पष्ट होणार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीसांनी देखील काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे बारामतीच्या रिंगणात सुनेत्रा पवार बिनविरोध निवडणूक लढणार की काँग्रेस त्यांच्या निर्णयावर ठाम राहणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार आकाश मोरे यांनी पक्ष श्रेष्ठ कडून आलेले आदेश आल्यानंतरच पुढील भूमिका मांडणार आहे, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे अजून पाच तासानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
हे देखील वाचा : Baramati by-electionची रणधुमाळी सुरु असताना सुनेत्रा पवार वर्षा बंगल्यावर; फडणवीसांनी दिला शब्द






