दादांचे नाव घेऊन राजकीय फायदा करून घ्यायचा आणि दादांच्या कुटुंबावर नाराज व्हायचे असे कसे चालले ? असे म्हणत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुरुषोत्तम जगताप यांचा समाचार घेतला.
Sharad Pawar : NDAसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर शरद पवारांनी अखेर स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘आपण कुठेही जाणार नाही, आम्ही कुणासोबत जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’, असं पवार म्हणाले.
पावसाने दडी मारल्याने नांदेडमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सोनखेड आणि लोहा येथे पाहणी करत सुनेत्रा पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही दिली.
75 टक्के राज्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे . सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार आहे, असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे.
Pune Beed Train: पुणे-बीड रेल्वेला १६ डबे असून, एकावेळी सुमारे दोन हजार प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी येणाऱ्या बीड व परिसरातील…
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने बीडकरांचं पुणे रेल्वे कनेक्शन अखेर सुरू झालं. सुनेत्रा पवारांच्या हस्ते बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या प्रयत्नांचा उल्लेख करत बीडच्या विकासासाठी…
बारामती तालुक्यातील शाळांचा दर्जा उंचावण्यासोबतच पुणे जिल्ह्यातील 600 जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण, डिजिटल सुविधा आणि शिक्षक प्रशिक्षणावर शासनाचा भर असल्याचं सुनेत्रा पवार यांनी…
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम इंदापूर तालुक्यात वाजू लागले असून, सहकारी संस्थांचे ठराव आपल्या बाजूने वळविण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
पुणे महानगर प्रदेशाच्या झपाट्याने होणाऱ्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी PMRDAच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. इनर रिंग रोड, हिंजवडी मेट्रो, पाणीपुरवठा, नदी प्रदूषण आणि अग्निसुरक्षेवर विशेष भर देण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी ४ कोटी ९६ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी…
Bandkhor Marathi Movie: महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’ चित्रपटाचा ट्रेलर सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत लॉन्च झाला. सहा स्त्रियांच्या संघर्षाची कहाणी २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार.
कामावर जाताना आणि सुटताना भुजबळ चौक ते विप्रो सर्कलदरम्यान तासनतास अडकून पडणाऱ्या लाखो आयटीयन्सची या दैनंदिन त्रासातून सुटका करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कंबर कसली आहे.
Sunetra Pawar on Supriya Sule : अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना सुनेत्रा पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. तपास यंत्रणांवर विश्वास असून दादांच्या मृत्यूचे राजकारण करू नये, असं…
मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर आज महायुतीच्या समन्वय समितीची हायव्होल्टेज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत महायुतीतील समन्वय, महामंडळांचे वाटप आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य…
वर्धा जिल्ह्यात पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. सिंचनाच्या उपलब्ध पाण्याचा वापर करून पिके वाचविण्यासाठी २४ तास अखंडित वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी उपमुख्यमंत्री…
Lagna Ani Barach Kahi: ‘लग्न आणि बरंच काही’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर सुनेत्रा पवार आणि अदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात अनावरण झाले. पूजा सावंत आणि अक्षया नाईक प्रमुख भूमिकेत…
दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे यांची बिनविरोध निवड झाली. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याच्या प्रगतीसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर सत्तेतून बाहेर पडण्याचेही धाडस दाखवावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला लगावला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिर परिसर तसेच मेडद येथील स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली.
सुनेत्रा पवार यांच्यावरील ‘गुंगी गुडिया’ टीकेवर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. हे वक्तव्य अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने भूमिका स्पष्ट केल्याचे म्हटले.