सुनेत्रा पवार यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली (फोटो - सोशल मीडिया)
बारामती पोटनिवडणुकीमध्ये घरचा सदस्याचे निधन झाल्यामुळे उमेदवार न देण्याचा निर्णय शरद पवार गटाने घेतला. मात्र महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांना उमेदवारी देऊन बारामतीच्या निवडणुकीमध्ये चुरस आणली. सुनेत्रा पवार यांनी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना स्वतः फोन केल्यानंतर देखील त्यांनी उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
हे देखील वाचा : राजकारण तापले! सुनेत्रा पवारांविरोधात करुणा मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल
सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि राजकीय विषयांवर चर्चा झाली. यावेळी राज्यसभा खासदार पार्थ पवार हे देखील उपस्थित होते. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांना एक महत्त्वाचा शब्द दिला. मीडिया रिपोर्टनुसार, बारामतीच्या पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीत सांगितले आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 55 उमेदवार रिंगणात उतरले आहे. यामध्ये सुनेत्रा पवार यांच्याविरोधात कॉंग्रेस उमेदवार आकाश मोरे आव्हान देणार आहेत. याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि ‘बिग बॉस’मधील स्पर्धक अभिजित बिचुकले यांचाही समावेश आहे. यामध्ये लक्ष्मण हाके हे देखील इच्छूक होते. मात्र त्यांना राजकीय समज दिल्यानंतर हाकेंनी माघार घेतली.
हे देखील वाचा : : कृतघ्न मुलगा अन् कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रसेनी पार्थ पवारांना धरलं धारेवर
पार्थ पवारांचा संताप
अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे या पोटनिवडणुकीला दुःखाची किनार आहे. यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोन करुन देखील महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आला. यामुळ पार्थ पवारांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला. हा कॉंग्रेसचा डाऊनफोल आहे आणि म्हणून काँग्रेसची महाराष्ट्रात दयनीय स्थिती असल्याची टीका पार्थ पवारांनी केली.यामुळे कॉंग्रेसने देखील सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे पार्थ पवार आणि काँग्रेस पक्षामध्ये राजकीय वादंग निर्माण झाल्याचे दिसून आले.






