अभिजीत दीपकेंच्या अटकेनंतर CJP च्या आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदेकडे!; व्हिडिओ संदेशातून मोठी घोषणा
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांचे पथक विमानात दाखल झाले. त्यानंतर दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना बसमधून अज्ञातस्थळी नेण्यात आल्याचाही दावा केला जात आहे. मात्र, या तिघांना औपचारिकरीत्या अटक करण्यात आली आहे का, तसेच त्यांना कोणत्या ठिकाणी नेण्यात आले, याबाबत अधिकृत पुष्टी आवश्यक आहे.
LIVE CJP Protest LIVE Updates: सीजेपी नेत्यांच्या अटकेनेंतर आंदोलनाचे नेतृत्तव अजिंक्य शिंदेंकडे
कॉकरोच जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या वृत्तामुळे जंतरमंतर येथील आंदोलनाच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्य नेते पोलिसांच्या ताब्यात असल्याने आंदोलनाचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, अभिजीत दिपके यांनी एक व्हिडीओ शेअर करून महत्त्वाची घोषणा केल्याचे सांगण्यात येत आहे. आपण पोलिसांच्या ताब्यात असतानाच त्यांनी CJP च्या नव्या नेत्याचे नाव जाहीर केल्याचा दावा केला जात आहे. आता या नव्या नेत्याची भूमिका काय असेल आणि जंतरमंतरवरील नियोजित आंदोलन पुढे सुरू राहणार का, याकडे लक्ष लागले आहे.
आभिजीत दिपके यांच्यासह आशुतोष रांका आणि सौरव दास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या घडामोडीनंतर अभिजीत दिपके यांनी व्हिडीओ शेअर करत आंदोलनाच्या नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य शिंदे याच्याकडे सोपवली आहे.
दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी व्हिडीओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संदेश दिला. आपल्यासह आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाच्या पुढील नेतृत्वाची घोषणा केली.
“सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व आता अजिंक्य शिंदे हा करेल. आशुतोष रांका, सौरव दास आणि मला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आमच्या तिघांनंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचे नेतृत्व करेल. तुम्ही माझा हा व्हिडीओ बघत असाल, तर अजिंक्य शिंदे याच्या मार्गदर्शनानुसार काम करा. आमच्या तिघांनंतर आंदोलनाची सूत्रे तो सांभाळेल,” असे अभिजीत दिपके यांनी व्हिडीओत म्हटले आहे.
मुख्य नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या वृत्तामुळे जंतरमंतर येथे नियोजित आंदोलनाच्या पुढील वाटचालीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, अभिजीत दिपके यांनी अजिंक्य शिंदे याच्याकडे नेतृत्व सोपवल्याची घोषणा केल्याने आंदोलनाची सूत्रे आता त्याच्याकडे असणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलनाची भूमिका घेतलेल्या CJP चे पुढील आंदोलन कशा पद्धतीने होणार आणि अजिंक्य शिंदे कार्यकर्त्यांना कसे मार्गदर्शन करणार, याकडे लक्ष लागले आहे.दरम्यान, तिघांना ताब्यात घेण्याची नेमकी कारणे आणि त्यांच्या कायदेशीर स्थितीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.






