CJP Tiranga Lehra Do Movement:आशुतोष रांका, सौरव दास यांच्या अटकेविरोधात CJPची 'लहरा दो तिरंगा' मोहीम; दिल्ली पुन्हा तापणार
CJP Tiranga Lehra Do Movement: १६ऑक्टोबरला सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंच ‘लेहरा दो तिरंगा’चं आवाहन
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना जंतरमंतरवर तिरंगा फडकावल्या प्रकरणी आणि घोषणाबाजी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीतही पाठण्यात आले आहे. या अटकेच्या विरोधाप्रकरणी उद्या १६ ऑक्टोबरला सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके यांनी देशाला “लेहरा दो तिरंगा ” या मोहिमेसाठी साद घातली आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास आणि सहकारी अजिंक्य शिंदे यांना दिल्ली पोलिसांनी अटक करत त्यांची तुरुंगात रवानगी केली. अटकेनंतर तिघांनाही मंदिर मार्ग पोलिस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आशुतोष, सौरव आणि अजिंक्य यांच्या अटकेवरून संताप व्यक्त केला आहे.
अभिजीत दिपके यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर एक्सवर एक व्हिडीओ शेअर करत ‘लेहरा दो तिरंगा’ मोहिमेसाठी दिल्लीसह देशभरातील तरुणांना आवाहन केलं आहे. “हॅलो मित्रांनो, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना फक्त तिरंगा फडकवाल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आले. पण आता जे लोक देशभक्त आहेत,जे लोक तिरंग्यावर प्रेम करतात, त्यांना माझी विनंती आहे की, येत्या १६ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता सेंट्रल पार्क, कॅनॉट प्लेस याठिकाणी आपापले तिरंगे घेऊन या, तिथे आपण सर्वजण एकत्र मिळून तिरंगा फडकवूया आणि तिरंगा फडकावणे हा गुन्हा नाही, हे आपण यांना (केंद्र सरकारला) दाखवून देऊयात.
Lehra do Tiranga 🇮🇳 16 Oct | Central Park, CP | 5 PM https://t.co/eFO1RfUBos — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 14, 2026
पण जे लोक दिल्लीत येऊ शकत नाही, त्यांनी आपापल्या शहरांमध्ये तिरंगा मार्च काढा, या लोकांना दाखवून द्या की आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे आणि तो फडकावणे हा गुन्हा नाहीये. हे या हुकुमशाहांना दाखवून देऊय. कदाचित यानंतर मलाही तुरुंगात टाकले जाऊ शकते, पण मला त्याची पर्वा नाही, तिरंगा हा माझा अभिमान आहे आणि तो मी फडकावणारच.” असा खुला इशाराही अभिजीत दिपके यांनी दिला आहे.
दुसरीकडे, आशुतोष आणि सौरव यांच्या अटकेवरून लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधींसह ‘इंडिया’ आघाडीनेही निषेध व्यक्त केला. इंडिया आघाडीनेही या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर आता सीजेपीच्या या ‘लहरा दो तिरंगा’ मोहिमेमुळे दिल्लीतील राजकीय व सामाजिक वातावरण कमालीचे तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे
जंतरमंतरवर जमावबंदी आणि आंदोलनांसाठी बंदी घातल्यानंतरही सौरव आणि आशुतोष यांनी तिरंगा फडकावून घोषणाबाजी केली. त्यामुळे आता सीजेपीने थेट मध्य दिल्लीतील अत्यंत वर्दळीच्या कॅनॉट प्लेस (CP) येथे तिरंगा आंदोलनाची हाक दिल्यामुळे दिल्ली पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचेही धाबे दणाणले आहेत.
खास बाब म्हणाजे, सोशल मीडियावर #LehraDoTricolour आणि #CJPProtest हे हॅशटॅग वेगाने ट्रेंड होताना दिसत आहेत. देशातील विविध विद्यार्थी संघटना व युवा वर्ग १६ ऑक्टोबरच्या या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
“केवळ राष्ट्रध्वज हातात घेतल्यामुळे आमच्या सहकाऱ्यांना तुरुंगात टाकले गेले. आता संपूर्ण देश हातात तिरंगा घेऊन कॅनॉट प्लेसवर उत्तर देईल.” असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे.
Ans: ही मोहीम शुक्रवारी, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता दिल्लीतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कॅनॉट प्लेस (Connaught Place) येथील 'सेंट्रल पार्क' येथे आयोजित करण्यात आली आहे.
Ans: आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि राष्ट्रध्वज फडकवणे हा गुन्हा नाही हे दाखवण्यासाठी सीजेपी प्रमुख अभिजीत दीपके यांनी या मोहिमेची हाक दिली आहे
Ans: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि 'इंडिया' (INDIA) आघाडीतील प्रमुख पक्षांनी सीजेपी नेत्यांच्या अटकेचा निषेध करत या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.






