हा देश का बरबाद करतोय... अभिजीत दीपकेंविरोधात घोषणाबाजी; असं दिलं उत्तर?
दुसरीकडे सीजेपीचे सहकारी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी थेट केंद्र सरकारवर टीका करत, देशात तिरंगा फडकवणे हा गुन्हा झाला आहे का, असा सवाल उपस्थित केला.
आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना केवळ जंतर-मंतर येथे जाऊन राष्ट्रध्वज फडकवल्यामुळे पाच दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आल्याचे अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी सांगितले. याचवेळी सार्वजनिक ठिकाणी तिरंगा फडकवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटिश राजवटीत अटक केली जात असल्याचेही सांहत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
खरंतर१२ ऑक्टोबर २०२६ रोजी जंतरमंतर परिसरात झालेल्या सीजेपीच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने जंतर-मंतरला आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी सकाळी आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी CJP कार्यकर्त्यांसह जंतर-मंतरच्या प्रवेशद्वारावरून आत प्रवेश केला आणि राष्ट्रध्वज फडकवत घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
परवानगीशिवाय जंतर-मंतर परिसरात प्रवेश करणे आणि आदल्या दिवशी दिलेल्या जामीनपत्रातील अटींचे उल्लंघन करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. यापूर्वी त्यांना एका वर्षापर्यंत शांतता राखण्याच्या अटीवर जामीन मिळाला होता.
दरम्यान, दीपके यांनी कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये राष्ट्रध्वज घेऊन नागरिकांनी जमण्याचे आवाहन केले. सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना केवळ तिरंगा फडकवल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
दिल्लीला येणे शक्य नसलेल्या नागरिकांनी आपापल्या शहरांत ‘तिरंगा मार्च’ काढावा, असे आवाहनही त्यांनी केले. आपल्यालाही अटक होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. ‘तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही, हे आम्ही दाखवून देऊ,’ असे दीपके यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
Ans: विमानतळाबाहेर पडताना एका व्यक्तीने दीपके यांना 'सीआयए एजंट' म्हणत "देश का बरबाद करत आहात?" असा सवाल केला.
Ans: जंतर-मंतर आंदोलनस्थळ रद्द केल्यानंतरही तिथे प्रवेश करून तिरंगा फडकवल्याने आणि घोषणाबाजी केल्याने ही कारवाई करण्यात आली.
Ans: राष्ट्रध्वज फडकवणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याच्या या कारवाईची तुलना त्यांनी ब्रिटिश काळातील दडपशाहीशी करत सरकारवर जोरदार प्रहार केला.






