Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Assembly Election Result 2025: भ्रष्टाचारापासून,आश्वासनांपर्यंत….; दिल्ली निवडणुकीत आपच्या पराभवाची काय आहेत कारणे?

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना सशर्त जामीन दिला आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्रीपद भूषवू शकणार नाहीत. भाजप आणि काँग्रेसने हे मुद्दे जोरदारपणे प्रचारात आणल्याने मतदारांचा विश्वास कमी झाला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 08, 2025 | 02:57 PM
Delhi Assembly Election Result 2025: भ्रष्टाचारापासून,आश्वासनांपर्यंत….;  दिल्ली निवडणुकीत आपच्या पराभवाची काय आहेत कारणे?
Follow Us
Close
Follow Us:

Delhi Assembly Election Result 2025 :   दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला.2015 मध्ये मध्ये ६७ जागांसह दणदणीत विजय मिळवणारा आप अवघ्या १० वर्षांत दिल्लीत सत्तेबाहेर पडला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालांनुसार, भाजप स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करत आहे. ७० सदस्यीय दिल्ली विधानसभेत सरकार स्थापनेसाठी ३६ जागांची आवश्यकता असते. आपच्या पराभवानंतर संपूर्ण देशात आपच्या पराभवाच्या कारणांवर चर्चा सुरू झाली आहे.आम आदमी पक्षाच्या पराभवाची मुख्य कारणे भ्रष्टाचाराचे आरोप आणि विकासकामांतील अपयश हे होते. अनेक प्रसंगी अपूर्ण कामांसाठी अन्य पक्षांवर दोषारोप केल्याचा आरोपही ‘आप’वर झाला. शिवाय, ‘आप’च्या मतदारांच्या पक्षांतरामुळेही पराभव झाला.

दिल्लीतील ‘आप’च्या पराभवाची ८ मुख्य कारणे:

१. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून उदयास आला. मात्र, १० वर्षांतच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर मोठे भ्रष्टाचाराचे आरोप झाले. दारू घोटाळ्यामुळे केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना तुरुंगात जावे लागले. तसेच, कॅगच्या अहवालातही रुग्णालय बांधकाम यांसारख्या प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. निवडणुकीत हा मुद्दा गाजला, मात्र ‘आप’ त्यावर योग्य उत्तर देऊ शकली नाही.

Delhi New CM : दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण? भाजपात ‘या’ नावाची जोरदार चर्चा

२. लाभार्थी मतदार भाजपकडे वळले

गेल्या निवडणुकांमध्ये ‘आप’ने मोफत वीज, पाणी आणि इतर सुविधांच्या आधारे मध्यम व गरीब वर्गाचे मत मिळवले. मात्र, भाजपने करमुक्त मर्यादा वाढवून आणि इतर आश्वासनांद्वारे या मतदारांना आकर्षित केले.

३. मुस्लिम आणि दलित मतदारांपासून दुरावले

२०१५ आणि २०२० च्या निवडणुकांत मुस्लिम आणि दलित मतदारांनी ‘आप’ला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. मात्र, यावेळी मुस्लिम मतदारांनी पूर्ण एकमताने ‘आप’ला मतदान केले नाही. दिल्लीतील विविध घटनांवर पक्षाची भूमिका स्पष्ट नसल्याने हा समाज पक्षापासून दुरावला.

४. अपूर्ण विकासकामे

एमसीडी निवडणुकीतील विजयानंतर ‘आप’ने स्वच्छ पाणी आणि चांगले रस्ते देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या समस्यांचे समाधान करण्यात पक्ष अपयशी ठरला.

५. दारू घोटाळ्याचा प्रभाव

उत्पादन शुल्क धोरणातील कथित गैरव्यवहार भाजपने मोठ्या प्रमाणावर प्रचारात आणला. न्यायालयीन कारवाई आणि अटींसह मंजूर झालेल्या जामिनामुळे ‘आप’ला प्रभावी बचाव करता आला नाही.

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा तापणार! जरांगे पाटलांकडून ‘या’ तारखेपासून

६. काँग्रेसच्या पुनरागमनाचा फटका

या निवडणुकीत काँग्रेसला अधिक मते मिळाली. काही ठिकाणी काँग्रेस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएममुळे ‘आप’चे मतविभाजन झाले आणि पक्ष मागे राहिला.

७. महिलांसाठीची आश्वासने हवेतच विरली

महिलांना दरमहा ₹२१०० देण्याचे ‘आप’चे मोठे आश्वासन होते. मात्र, जनतेने त्यावर विश्वास ठेवला नाही.

८. केजरीवालांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना सशर्त जामीन दिला आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्रीपद भूषवू शकणार नाहीत. भाजप आणि काँग्रेसने हे मुद्दे जोरदारपणे प्रचारात आणल्याने मतदारांचा विश्वास कमी झाला.दिल्लीतील सत्ता गमावण्यामागे भ्रष्टाचाराचे आरोप, मुस्लिम व दलित मतदारांचा घटलेला पाठिंबा, अपूर्ण विकासकामे आणि काँग्रेसच्या मतविभाजनाचा मोठा प्रभाव होता.

Web Title: Delhi assembly election result 2025 what are the reasons for aaps defeat in the delhi elections nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 02:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.