धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मनोज जरांगेंनी केली 'ही' मागणी; 'देशमुख यांची हत्या झाल्यानंतर...' (फोटो - सोशल मीडिया)
जालना : राज्यामध्ये मागील दीड वर्षापासून मराठा आरक्षण हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत महायुतीकडे आरक्षणाची मागणी केली आहे. जरांगे पाटील यांनी महायुती सरकारकडे ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात यावी अशी मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये देखील जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन उभे केले होते. आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी साखळी उपोषणाची घोषणा केली आहे.
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जरांगे पाटील यांनी 25 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरु केले होते. पुन्हा एकदा त्याच मागणीसह जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उगारले होते. मात्र सहा दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी त्यांनी पुन्हा आमरण उपोषण करणार नाही असे जाहीर केले होते. मात्र आता शांत देखील बसणार नाही, असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला होता.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा समाजाने केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी न केल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठा समाज बेमुदत साखळी उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. अंतरवाली सराटीतून या आंदोलनाला सुरुवात होणार असून, याचे लोण राज्यभरात पसरणार असल्याचं जरांगे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर दोन तीन दिवसात मुंबईतल्या आझाद मैदानाचीही पाहणी करणार असून मुंबईतही आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
दिल्लीचा निकालच्या अपडेट घ्या एका क्लिकवर
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडताना भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली होती. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ मागण्या लागू करतो असं आश्वासन देऊन उपोषण सोडवून घेतलं. मात्र, तेरा चौदा दिवस झाले फडणवीसांनी एकाही मागणीच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली नाहीये. याउलट मराठ्यांच्या पोरावरच्या केसेस उकरून काढून त्यांना नोटीस पाठवत आहेत. त्यामुळं मराठ्यांनी ठरवलं तर आयुष्य भर फडणवीसांना गादीला शिवू देणार नाही. फडणवीसांनी मला हलक्यात घेऊ नये, बेकार होईल, असा इशाराही मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.
मराठा आरक्षणामुळे महायुती चिंता वाढली
मागील दीड ते दोन वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये उपोषण करत आहेत. सर्व मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्यात यावी अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे. त्याचबरोबर आंदोलन काळामध्ये मराठा तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे. यासाठी त्यांनी निवडणुकीच्या पूर्वीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. आता मात्र निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे.