Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratan Tata death news live updates : दुर्मिळ रत्न हरपले….मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली रतन टाटा यांना आदरांजली

प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं बुधवारी रात्री निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 10, 2024 | 09:24 AM
Ratan Tata death news live updates

Ratan Tata death news live updates

Follow Us
Close
Follow Us:

 Ratan tata death live updates: मुंबई : उद्योगक्षेत्रातील चाणक्य आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे भारताच्या उद्योगजगतात मोठी शोककळा पसरली आहे. जगभरातून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.  रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, त्यांचे उपचारादरम्यानच निधन झाले. उद्योगपती रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात आज दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावना व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आठवणींना उजाळा

रतन टाटा यांच्यावर मृत्यूनंतर भावना व्यक्त करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “दुर्मिळ रत्न हरपले… नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. रतनजी टाटा हे भारताचा अभिमान होते, येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी ते नेहमीच एक आदर्श राहतील. रतनजी टाटा यांनी अतिशय कौशल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक कंपन्यांना टेकओव्हर करुन व्यवसाय वाढवला. माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांतही त्यांनी दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला. आपल्या निर्णयक्षमतेने त्यांनी टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्ये सळाळते चैतन्य निर्माण केले. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास करण्याची टाटांची विचारधारा आणि परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. रतनजी टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी होती. तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. २००८ च्या मुंबई हल्ल्यांनंतर रतनजी टाटा यांनी दाखवलेला खंबीरपणा सगळ्यांच्या कायमच स्मरणात राहील. त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे स्मरण कायम राहणार आहे,” अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

दुर्मिळ रत्न हरपले

नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक… pic.twitter.com/6O1KmyJkyj

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 9, 2024

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रतन टाटा हे केवळ यशस्वी उद्योगपतीच नव्हते कर अतिशय मोठ्या मनाचा व्यक्ती होता. रतन टाटा यांनी देशामध्ये उद्योग तर सुरु केलेच पण त्याचबरोबर एक मोठी विश्वासहर्ता उभी केली. आणि टाटा हा ब्रॅन्ड ग्लोबल केला. जगाचा पाठीवर विश्वास मिळवला. पण त्याचवेळी आपली सगळी संपत्ती ही टाटा ट्रस्टच्या माध्यमांतून विश्वस्त व्यवस्थेमध्ये त्यांनी ठेवली. या टाटा ट्र्स्टने केलेले जे काही कार्य आहे समाजोपयोगी जे काम केलं आहे, संशोधनाच्या क्षेत्रामध्ये केलेलं जे काम आहे. या सर्व गोष्टी आदर्शनीय आहेत. रतन टाटा हे असे व्यक्ती आहेत जे स्वतःपेक्षा समाजासाठी आणि देशासाठी जास्त जगले आहेत. अशा प्रकारचा व्यक्ती निघून जाणं हे देशाचं फार मोठ नुकसान आहे. त्यांची जागा कोणीची भरु शकत नाही. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्माला शांती मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

श्री रतन टाटा जी यांची जागा कोणीही भरू शकत नाही.
श्री रतन टाटा जी हे स्वतःपेक्षा जास्त देशासाठी आणि समाजासाठी जगले.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो…#RatanTata pic.twitter.com/6dkZRu51zs

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 9, 2024

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार यांनी लिहिले आहे की, दिग्गज उद्योगपती आणि समाजसेवी श्री. यांच्या निधनाच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले. रतन टाटा एक उद्योगपती म्हणून त्यांच्या अमूल्य योगदानाव्यतिरिक्त, त्यांनी परोपकार आणि करुणेचा वारसा सोडला आहे, जो त्यांच्या देशावरील अपार प्रेमाने अधोरेखित झाला आहे.या दु:खाच्या वेळी माझ्या प्रार्थना त्यांच्या प्रियजनांसोबत आणि लाखो चाहते आणि हितचिंतकांसोबत आहेत, अशी श्रद्धांजली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली आहे.

Web Title: Eknath shinde devendra fadnavis ajit pawar on rattan tata death live updates age funeral last

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 09:24 AM

Topics:  

  • Ratan Tata Death

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.