(Photo - X)
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीकडून अनेक दिग्गज नेते मैदानात होते. खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.
#गोकुळ 16-09
अभिनंदन बंटीदादा, मानलं राव तुम्हाला!
शेवटी काय, तो कंडका पाडलाच! 🔥💪
@satejp https://t.co/62xFcVoXgF — Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) October 19, 2026
निकालानंतर विश्वजीत कदम यांनी सतेज पाटील यांचं अभिनंदन करत, “अभिनंदन बंटीदादा, मानलं राव तुम्हाला. शेवटी काय, तो कंडका पाडलाच!” अशी प्रतिक्रिया दिल्याचं वृत्त आहे. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, आधीच्या भाषणातील ‘कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलाला विचारून करायचं’ या विधानाचीही आठवण काढली जात आहे.
आमदार रोहित पवार यांनीही या विजयाबद्दल सतेज पाटील, ऋतुराज पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं. गोकुळसारख्या महत्त्वाच्या संस्थेत सभासदांच्या हिताला प्राधान्य मिळावं आणि दूध उत्पादकांना चांगले दिवस यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसंच, पैसा आणि सत्तेच्या बळावर अडथळे निर्माण झाले तरी संघर्ष सुरू ठेवण्याचा संदेश या निकालातून मिळतो, असंही रोहित पवार यांनी म्हटलं.
या निवडणुकीत महायुतीसाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे प्रमुख नेत्यांच्या कुटुंबातील उमेदवारांना आलेलं अपयश. मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ आणि भाजपच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांचा पराभव झाल्याचं वृत्त आहे. शौमिका महाडिक यांना 120 मतांनी पराभव स्वीकारावा लागल्याची माहिती दिली जात आहे.
एकूणच, गोकुळच्या निकालामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सतेज पाटील यांच्या आघाडीच्या या कामगिरीचा आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Ans: सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने विजय मिळवला.
Ans: विश्वजीत कदम यांनी सतेज पाटील यांचं अभिनंदन करत, “मानलं राव तुम्हाला. शेवटी काय, तो कंडका पाडलाच!” अशी प्रतिक्रिया दिली.
Ans: मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ आणि शौमिका महाडिक यांचा पराभव झाला आहे.






