राजेश क्षीरसागर यांच्या कथित 40 लाखांच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापुरात राजकीय वातावरण तापले आहे. आमदारपुत्रांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले असून विरोधकांनी या प्रकरणात SIT चौकशीची…
'कोल्हापूरचा पैलवान पुण्यात आला, कोल्हापुरात हारला आणि पुण्यातही पक्ष सपाट केला', अशा आशयाचे हे मजकूर असलेले बॅनर्स सध्या सोशल मीडियासह दोन्ही जिल्ह्यांमध्ये चर्चेचा मोठा विषय बनले आहेत.
मे महिन्यात ९ विधान परिषदेच्या जागा रिक्त होणार आहेत. भाजपच्या ४, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाची प्रत्येकी १ जागा रिक्त होणार आहे.
स्थानिक नेतृत्वात ताकद नाही. त्यामुळं वरिष्ठ पातळीवरील नेते प्रचारासाठी येत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे प्रचारसभा घेत आहेत. अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध महायुती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीणीसाठी आक्रोश सुरु झाल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात जिओ पोर्ट करण्याची मोहीम सुरु झाल्यानंतर वनताराचे सीईओ शुक्रवारी कोल्हापुरात पोहोचले होते.
काँग्रेस पक्ष नाही, तर लोकांपर्यंत पोहोचणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष ताकदीने उभा राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये १८ ते २५ वयोगटापर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
शक्तीपीठ महामार्ग बनवण्याबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत. तर शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे. यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन केले जाणार आहे. याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध होत आहे.
भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीने खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.
आम्ही दूध दरवाढीचा जो शब्द दिला होता त्याप्रमाणे दरवाढ केली आहे. गोकुळ कोणाच्या हातात असलं तर टँकर कोणाचे लागणार हे शेतकऱ्यांना माहिती आहे, असे सतेज पाटील म्हणाले.
सरकारकडून विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली जात नाही. सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते ? असा सवाल माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी उपस्थित केला.
कोल्हापूर हद्दवाढीवरुन परस्पर विरोधी भूमिका राजकीय पक्षात दिसू लागली आहे. राज्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे सर्वसामान्य जनतेतून उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागले आहेत.
मुंबईतील विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली.
शक्तीपीठ महामार्ग हा चर्चेमध्ये राहिला आहे. सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी यासाठी विरोध केला आहे. आता यावर कॉंग्रेस नेते सतीश पाटील यांनी प्रतिक्रिया देत उपाय सांगितला आहे.