आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, "धर्मनिरपेक्षता आणि समानतेचा पुरस्कार करणारा पक्ष भाजपच्या तिकिटावर उमेदवार उभे करत होता.
क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सदनिका प्रकरणामुळे आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी रोहित पवारांनी आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीच्या टायमिंगवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.
पुणे विद्यापीठासह अनेक सरकारी विद्यापीठांमधील अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी पाहिली असता ते आरएसएसशी संबंधित आहेत किंवा ते आरएसएस च्या विचारसरणीचे पालन करताना दिसतात.
भाजप नेते नितेश राणे आणि शिवसेना शिंदे गट नेते निलेश राणे यांच्यामध्ये वाद उफाळून आला. या प्रकरणावर आता शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. डिसेंबर महिन्यात 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला निकाल जाहीर होणार आहे.
उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील समर्थकांनी जल्लोष करत अजित पवारांना चॅलेंज दिले. यावर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत नाराजी व्यक्त केली,
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान पक्षात सामील झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काशीनाथ चौधरी यांचा भाजपने प्रवेश रद्द केला आहे. भाजपने पालघर जिल्हा युनिटचा निर्णय रद्द केला आहे.
जर आम्ही तुमच्या जमिनीचे घोटाळे उघडकीस आणले तर ते घोटाळे तुम्हाला कुठे नेऊन ठेवतील हे कळणार नाही, असा इशारा जयकुमार गोरे यांनी रोहीत पवारांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या राजकीय धोरणांवर जोरदार हल्लाबोल करत शिंदे आणि अजित पवार गटाच्या नेत्यांना 'जागे व्हा' असा इशाराही दिला.
भाजप आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध फसवणूक, जातीय व धार्मिक तणाव निर्माण करणे, भीती पसरविणे, यांसारख्या कलमानुसार गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात हे गुन्हे आमच्या विरोधात दाखल केले जात आहेत, असे…
आमदार रोहित पवार यांच्यावर बोगस आधार कार्ड आणि मतदार यादीच्या मुद्द्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने याविरोधात तीव्र निषेध केला आहे.
Mumbai BJP Office: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईतील भाजप कार्यालयाचे उद्घाटन केले. मात्र भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झालेली जागा नक्की कुणाची? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मतदार यादीत दुरुस्ती होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत असे म्हटले होते. दरम्यान, रोहित पवार यांनी मतदानासाठी बनावट आधार ओळखपत्रांचा वापर केल्याचा खुलासा केला आहे.
पुण्यातील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षा चालक आणि बसलेले प्रवासी जखमी झाले. रिक्षा चालकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Nashik Shetkari Aakrosh Morcha : नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा शेतकरी आक्रोश मोर्चा पार पडला आहे. यामध्ये आमदार रोहित पवार यांनी कांद्याची माळ गळ्यामध्ये घालून आंदोलन केले.