
Thane Municipal Corporation Elections
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर ‘सर्वांनाच ढ ढ म्हणून पक्षचं ढगात गेलायं.पण, त्या पक्षाच्या ‘रावणाचा’ अहंकार काही मोडत नाही.”असा पलटवार करत जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पण या बॅनरबाजीवरुन पुन्हा नवा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचे सत्र सुरू झाले आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विक्रम खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही अजित पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश केला, अशी माहिती मिळाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकताच एका पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षप्रवेशानंतर शरद पवार गटाने शहरात बॅनर लावून सुहास देसाई यांच्यावर टीका केली आहे. चंदनवाडी आणि गणेशवाडी परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर असा संदेश देण्यात आला आहे: “एका ढ विद्यार्थ्याने शाळा सोडली तर, नुकसान त्याचे होते. विद्यापीठाचे नाही.” या बॅनरमार्फत पक्ष सोडणाऱ्यांना फटकारण्यात आले आहे. स्थानिक परिसरात या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.
Navi Mumbai Crime: मुख्याध्यापिकेकडून अपमान झाल्याने दहावीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
सुहास देसाई यांच्या पक्षप्रवेशामुळे राबोडी मतदारसंघातील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या पॅनलला बळ मिळाले आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम खामकर यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पाठिंबा सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारी सुरु केल्याची चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शहर पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी पक्षाला रामराम केल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदी कळव्यातील अरविंद मोरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. वर्षा मोरे, कळव्यातील एकमेव नगरसेवक, आव्हाड गटाबरोबर राहिलेल्या आहेत. पक्षाला नव्याने उभारी मिळवण्यासाठी कट्टर कार्यकर्त्याची गरज असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, माजी विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांच्याही नावाची चर्चा अध्यक्षपदासाठी रंगत आहे.