Farmers Rickshaw Scheme: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख रिक्षा देण्याचा सरकारचा विचार! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी माहिती

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत शेतीतील उत्पन्नावर अवलंबून न राहता रोजगाराचा दुसरा पर्याय मिळावा, या उद्देशाने त्यांना टप्प्याटप्याने १ लाख रिक्षा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
Maharashtra Govt Plans 1 Lakh Rickshaws for Drought-Hit Farmers: Pratap Sarnaik Announces New Scheme
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख रिक्षा देण्याचा सरकारचा विचार! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी माहिती (Credit- AI)Maharashtra Farmers, Pratap Sarnaik, Eknath Shinde, Rickshaw Scheme, Drought Relief, Maharashtra Govt,
Published on: 
Updated on: 
  • १ लाख रिक्षा वाटपाच्या योजनेचा प्रस्ताव

  • अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त रिक्षा सन्मान योजना' असे नाव

  • ९ फेब्रुवारी रोजी शुभारंभाचे नियोजन

Farmers Rickshaw Scheme: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारकडून नव्या योजनेची आखणी करण्यात येत आहे. शेतीतील उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या परिस्थितीत पर्यायी रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने त्यांना रिक्षा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्याने तब्बल १ लाख रिक्षांचे वाटप करण्याचा सरकारचा विचार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातील

माहिती दिली आहे. राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

"योजनेच्या सुरुवातीसाठी ९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्याचे नियोजन आहे. ९ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून, त्याच दिवसापासून या रिक्षा वाटप योजनेची सुरुवात करण्याचा सरकारचा विचार आहे. या उपक्रमाला 'अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त रिक्षा सन्मान योजना' असे नाव देण्यात आले असल्याचेही प्रताप सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरवर्षी २० हजार रिक्षांचे वाटप करण्याचे नियोजन

प्रस्तावित योजनेनुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांना एकूण १ लाख रिक्षा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, एकाच वेळी सर्व रिक्षांचे वाटप न करता दरवर्षी २० हजार रिक्षा देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात १ लाख रिक्षा वितरित करण्याची योजना असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. या योजनेचा लाभ राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतक-यांना मिळणार आहे.

९० टक्के कर्ज, १० टक्के अनुदान

रिक्षा खरेदीसाठी लागणाऱ्या एकूण रकमेपैकी ९० टक्के रक्कम कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर उर्वरित १० टक्के रक्कम सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे.

त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे रिक्षा खरेदी करणे शक्य नसलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

याशिवाय, योजनेतून रिक्षा मिळणा-या लाभार्थ्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आकारले जाणारे (आरटीओ) शुल्क माफ करण्याचाही प्रस्ताव आहे. यामुळे रिक्षा खरेदी आणि नोंदणी प्रक्रियेतील आर्थिक भार कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.