Manoj Jarange Patil announces azad maidan andolan for Maratha reservation
जालना : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतले आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण सुरु होते. त्यानंतर हे उपोषण त्यांनी स्थगित केले आणि आता आरक्षणासाठी मास्टर प्लॅन तयार केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून आक्रमक भूमिका घेतली आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुढील प्लॅन सांगितला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंच मागे हटणार नाही. कितीही ताकद लावायची ती लावणार आणि आरक्षण मिळवणार. आम्ही उपोषण केले, शांतपणे आंदोलन केले. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च या एक महिन्यात गाठी भेटी नियोजन करणार, थेट गावातील अडचणी समजून घेणार. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च या काळात छत्रपती भवन, शहागड पैठण फाटा या ठिकाणी अडचणी घेऊन या, असे आवाहन जरांगे यांनी यावेळी केले. एक महिन्यात राज्यातील गावा गावातील अडचणी छत्रपती भवन येथे सोडवल्या जाणार असल्याची माहिती देखील जरांगे पाटील यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिली. आता समोरासमोर आंदोलन करण्यात येईल असे जरांगे पाटील म्हणाले,”कुणबी आणि मराठा एकच आहेत, आणि हे विदर्भ आणि खानदेश मधील मराठ्यांनी लक्षात ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले. फडवणीस यांना बापाची माया आहे हे काल दिसून आले, ते वर्षावर जाणार पण माझ्या मुलीची परीक्षा आहे,” असे ते म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अपडेट घ्या एका क्लिकवर
पुढे ते म्हणाले की, “लेक काय असते तुम्हाला कळाले, आमच्या लेकरांच्या आत्महत्या झाल्या, हे तुम्हाला का कळत नाही, आमच्या लेकरांची माया का येत नाही, आरक्षण का देत नाहीत. स्वतःच्या मुलीचा शब्द मोडत नाहीत. तुम्ही आमचे EWS घालवले आणि खापर आमच्यावर फोडतात. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत आमच्या मागण्यांबाबत काहीही निर्णय घेतला नाही, हा भेदभाव कशामुळे?” असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
धनंजय मुंडेंवर साधला निशाणा
मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर देखील निशाणा साधला होता. यावेळी ते म्हणाले की, “पहिल्यापासून तो खूपच घोटाळेबाज, लफेडबाज आहे. राज्याला तो मोठा दुर्देवी डाग आहे. गोरगरीबांची, शेतकऱ्यांची, ओबीसींच सहकार्य घ्यायच आणि त्यांच्याच ताटात माती कालवायची हा त्याचा एक पिंड झालेला आहे. गरज आहे तो पर्यंत जवळ घ्यायच, त्यांनाच मग चुरून खायचा. ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे. ती आता उघडी पडली. आधी लोक बोलत नव्हते आता बोलायला लागले. या राज्यातला एक मंत्री एवढा भ्रष्टाचार करत असेल, तर सरकार त्याला जवळ करतच कसं? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे,” असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंबाबत व्यक्त केले आहे.