mp sanjay raut target pm narendra modi Ahmedabad Plane Crash
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. हा अपघात म्हणून मृत्यूचा तांडव ठरला आहे. एअर इंडियाच्या झालेल्या या अपघातामध्ये तबब्ल २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अहमदबादमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे. तसेच हॉस्पीटलच्या वसतीगृहामध्ये असणाऱ्या डॉक्टर्सचा देखील मृत्यू झाला आहे. या प्रकरणामध्ये आता खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर रोष व्यक्त केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यीं विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. त्याचप्रमाणे एअर इंडियाच्या विमानाचा झालेल्या अपघातावरुन देखील संशय व्यक्त करत रोष व्यक्त केला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “संपूर्ण देश शोककलेत आहे. या अपघाताची कोणी जबाबदारी घ्यायला तयारी नाही. कालच्या विमान अपघाताच कोणी राजकारण करु नये, अशी विनंती खासदार राऊत यांनी केली आहे. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, एअर इंडिया या कंपनीचे खाजगीकरण केले आहे. टाटांनी 1 कोटी रुपये दिलं म्हणजे सर्व प्रश्न संपत नाहीत. यांना विमान अपघात, रेल्वे अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येत?” असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे राऊत म्हणाले की, “प्रफुल पटेल मंत्री असताना भाजपने अक्षेप घेतला होता. आम्हाला राजकारण करायचं नाही मात्र यावर प्रश्न विचारला जातोय. यापूर्वी असे अपघात झाले तेव्हा भाजप राजीनामा मागत होते. आता काय? जिथे माणसं मेलीत त्या राखेवर पाय ठेवून चित्रीकरण करत आहे. ३० सेकंदात विमान कोसळतंय. दोन्ही इंजिन बंद कसे पडतात? विजय रुपाणी हे मुख्यमंत्री आणि खासदार होते त्यांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान, नागरी उड्डाण मंत्री यांनी कोणी तरी जबाबदारी घेतली पाहिजे. हल्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री घेत नाही. इथे फडणवीस आणि मोदी मजा करत आहे जनता मरते. जे मृत झाले आहेत त्यांच्या कुटुंबीयांनी राजीनाम्याची मागणी केली पाहिजे,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
अहमदाबाद दुर्घटनेबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. यावरुन देखील संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधानांना संवेदना नाही तर जबाबदारी घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी सर्वात आधी संवेदना व्यक्त केली. आदित्य ठाकरे यांनी वाढदिवस रद्द केला आहे. भारततातून हवाई प्रवास सुरूक्षित नाही अशी भूमिका जगभरात घेतली तर देशाची नाचक्की होईल. एकेकाळी महाराजा अशी ओळख होती त्यामुळे आमचा जीव जळतोय. गुजरात दुर्घटना प्रकरणी अत्यंत शोकजन्य आहे. देशातील हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंताजनक आहे. हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणचे २४ डॅाक्टर आणि विद्यार्थी यांचा मृत्यू झाला. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी माझे ही सहकारी होते. मात्र एवढ होत असताना कोणाही जबाबदारी घ्यायला दिसत नाही. रेल्वे अपघात होतात, पहेलगाम हल्ला असेल मात्र सरकारच्या चेह-यावर चिंता दिसत नाही,” अशी गंभीर टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.