नरेंद्र मोदी गुजरातमध्ये दाखल; घटनास्थळासह रमेश विश्वास यांची घेतली भेट
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये गुरुवारी घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेत आतापर्यंत २६५ जण मृत्यूमुखी पडले. यापैकी २४१ जण विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, तर उर्वरित पाच मृतदेह विमान कोसळलेल्या बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील रहिवाशांचे असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. अपघातावेळी वसतिगृहात ५० हून अधिक लोक उपस्थित होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत चार MBBS विद्यार्थी आणि एका डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तथापि, वसतिगृहातील एकूण मृतांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
Air India Plane Crash: मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान माघारी परतले; नेमकं झालं काय?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अहमदाबादला पोहोचले. त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल पीडितांची भेट घेऊन त्यांच्या तब्यतीची विचारपूस केली. या भेटीत ते सुमारे १० मिनिटे उपस्थित होते. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाल्याचे दु:खद वृत्त आहे. विशेष म्हणजे, या दुर्घटनेत फक्त एकच प्रवासी बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अहमदाबादला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी थेट घटनास्थळाला भेट दिली. यानंतर त्यांनी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल गाठले आणि अपघातातून वाचलेले एकमेव व्यक्ती रमेश विश्वास कुमार यांनाही भेट घेतली. सध्या रमेश विश्वास यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पंतप्रधान आज या अपघाताबाबत आढावा बैठकही घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटना; 265 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश
पंतप्रधान मोदींचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला आहे. गुजरात हे पंतप्रधान मोदींचे गृहराज्य आहे. २००१ ते २०१४ पर्यंत ते सलग चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. गुजरातमधील त्यांच्या सातत्यपूर्ण राजकीय यशामुळे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाली. पंतप्रधानांच्या गृहराज्यात घडलेल्या या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे.
गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ भाजप नेते विजय रुपाणी यांचेही निधन झाले. एअर इंडिया फ्लाइट A171 अपघातात गुजरातमधील आणंद येथे राहणाऱ्या 33 जणांना आपला जीव गमवावा लागला. आणंदचे जिल्हाधिकारी प्रवीण चौधरी म्हणाले की, यादीची तपासणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी १२ जण राजस्थानचे आहेत. या अपघातात बांसवाडा येथील रहिवासी डॉ. दीपक, त्यांची पत्नी, मुलगी आणि दोन जुळ्या मुलांचाही मृत्यू झाला.