एकाच वेळी ११ राज्यांत निवडणुकांची तयारी? २०२९ मध्ये देश एकत्र मतदानास जाणार; JPC कडून वेगाने काम सुरू
याचा अर्थ, पुढील लोकसभा निवडणुका पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात घेतल्या जाऊ शकतात. विधानसभा निवडणुकाही एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात. असे झाल्यास, सर्व राज्यांच्या विधानसभा एकाच वेळी विसर्जित केल्या जातील. सध्या रालोआच्या राजवटीत असलेल्या ११ राज्यांमध्ये दोन वर्षांत निवडणुका होणार आहे. सध्या, देशभरातील २२ राज्यांमध्ये रालोआ सत्तेत आहे. यापैकी ११ राज्यांमध्ये पुढील दोन वर्षांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. चार राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकांसोबतच निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात.
संसदेचे हिवाळी अधिवेशन साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते आणि ख्रिसमसपूर्वी संपते. ही ४१ सदस्यीय समिती ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ प्रणाली लागू करण्यासाठी संविधान (१२९ वी दुरुस्ती) विधेयक, २०२४ वर विचारविनिमय करत आहे. २०२९ पर्यंत लोकसभा, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रस्तावावर समिती देशभरात विचारविनिमय करत आहे. काही भाजप मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकांसोबतच विधानसभा निवडणुका घेण्याची इच्छा आधीच व्यक्त केली आहे. गोवा, हरियाणा आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी याला पाठिंबा दर्शवला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही १ जुलै रोजी समितीची भेट घेतली.
संयुक्त संसदीय समिती गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असून, या हिवाळी अधिवेशनात आपला अहवाल संसदेत सादर करू शकते. संविधानाच्या कलम १७४ २, ३ नुसार राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, एकाच वेळी निवडणुका आवश्यक असल्यास, राज्य विधानसभा जानेवारी महिन्यातच विसर्जित केली जाईल, पनडीए सरकार असलेल्या राज्यांमध्ये है अधिक सोपे होईल, कारण राज्यपाल केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच विधानसभा विसर्जित करू शकतात.
Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल!; एकनाथ शिंदेंचे मोठे आवाहन
आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशा यांचा समावेश आहे. २०२४ मध्ये ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ योजनेसाठी स्थापन केलेल्या समितीचे उद्दिष्ट २०३४ मध्ये एकाच वेळी निवडणुका घेण्याची रणनीती विकसित करणे हे होते. इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, सस्कार आता यासाठी जास्त काळ वाट न पाहण्याचा प्रयत्न करत आहे.






