राहुल गांधी करणार शरद पवारांची मनधरणी; ब्रीच कॅन्डी रूग्णालयात घेणार भेट

डिलिमिटेशन विधेयकावरून इंडिया आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. आघाडीतील एकजूट कायम ठेवण्यासाठी राहुल गांधी आता शरद पवारांची भेट घेणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह ते ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.
Rahul Gandhi Mumbai Sharad Pawar meet Breach Candy Hospital.jpg
राहुल गांधी घेणार शरद पवारांची भेट (फोटो - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • राहुल गांधी स्वतः करणार शरद पवारांची मनधरणी

  • शरद पवारांची ब्रीच कॅन्डी रुग्णालयात घेणार भेट

  • राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खर्गे राहणार उपस्थित

Rahul Gandhi meet Sharad Pawar : मुंबई : डिलिमिटेशन बिलावरून राज्यात आणि केंद्रात राजकारण तापले आहे. या विधेयकेला इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांनी पाठिंबा देण्याचा विचार केल्याने इतर विरोधी पक्षांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि डीएमके प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी विधेयकाला पाठिंबा दाखवण्याची तयारी दाखवल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वतः दोन्ही नेत्यांची भेट घेण्याचे ठरवले आहे.

इंडिया आघाडीतील उभी फूट रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी स्वतः दिल्ली सोडून एम.के. स्टॅलिन व शरद पवार यांची स्वतः भेट घेण्याचे ठरवले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व सोनिया गांधी यांनी राहुल गांधींसह चैन्नई दौरा केला आहे. एम. के. स्टॅलिन यांना डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करण्यासाठी त्यांची समजूत काढली आहे. याचबरोबर आता राहुल गांधी हे शरद पवारांची समजूत काढणार आहेत. यासाठी राहुल गांधी हे मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह ब्रीच कॅन्डी रुग्णालयात येऊन शरद पवारांची भेट घेणार आहेत.

सोनिया गांधी यांचा मुंबई दौरा रद्द झाला असला तरी राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे हे शरद पवारांची भेट घेणार आहेत. शरद पवार हे सध्या त्यांच्या प्रकृतीमुळे ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. रात्री उशीरापर्यंत या रुग्णालयाबाहेर खासदार सुप्रिया सुळे एकट्याच थांबल्याचे दिसून आले होते. आता डिलिमिटेशन बिलाबाबत मन वळवण्यासाठी राहुल गांधी हे स्वतः शरद पवारांची रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत.

राहुल गांधींचा चैन्नई दौरा यशस्वी? एम. के. स्टॅलिन यांनी भेटीनंतर सूचक पोस्ट केल्याने चर्चांना उधाण

राहुल गांधी यांच्या चैन्नई दौऱ्याबाबत एम के स्टॅलिन यांनी एक्सवर पोस्ट केली. त्यांनी लिहिले, "संविधानाचे रक्षण करण्यामध्ये आणि राज्यांचे अधिकार जपण्यामध्ये द्रमुकची (DMK) ऐतिहासिक भूमिका मान्य केल्याबद्दल भाऊ राहुल गांधी यांचे मनापासून आभार. आम्ही नेहमीच तामिळनाडू आणि आमच्या तामिळ जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रत्येक निर्णय घेतला आहे. आम्ही या मार्गावरून तसूभरही मागे हटणार नाही किंवा कोणतीही तडजोड करणार नाही. मला खात्री आहे की, इतिहास आमची नोंद 'एट्टाप्पन' (विश्वासघातकी) म्हणून नव्हे, तर 'कट्टाबोम्मन' (स्वाभिमानी रक्षक) म्हणून करेल," अशी सूचक पोस्ट स्टॅलिन यांनी केली.

डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी; 'या' बड्या नेत्याने दिला राजीनामा

Q

राहुल गांधी शरद पवारांची भेट का घेणार आहेत?

A

डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पाठिंबा देण्याची तयारी दाखवल्याने राहुल गांधी शरद पवारांची भेट घेणार आहेत. इंडिया आघाडीतील एकजूट कायम ठेवण्यासाठी ते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Q

राहुल गांधी शरद पवारांची भेट कुठे घेणार आहेत?

A

राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांची भेट घेणार आहेत.

Q

एम. के. स्टॅलिन यांनी राहुल गांधी यांच्या भेटीनंतर काय प्रतिक्रिया दिली?

A

राहुल गांधी यांचे आभार मानत एम. के. स्टॅलिन यांनी तामिळनाडू आणि तामिळ जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच या भूमिकेवर कोणतीही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले.