राहुल गांधींचा चैन्नई दौरा यशस्वी? एम. के. स्टॅलिन यांनी भेटीनंतर सूचक पोस्ट केल्याने चर्चांना उधाण

डिलिमिटेशन विधेयकावरून इंडिया आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. डीएमके प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे चेन्नईत दाखल झाले. या भेटीनंतर स्टॅलिन यांनी एक्सवर सूचक पोस्ट करत तामिळनाडूच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले.
Rahul Gandhi Chennai visit meet DMK Thiru M. K. Stalin .jpg
राहुल गांधी यांनी चेन्नईत जाऊन डीएमके नेते एम. के. स्टॅलिन यांची मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासंबंधित चर्चा केली (फोटो - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • राहुल गांधींसह सोनिया गांधी व मल्लिकार्जुन खर्गे चैन्नईला रवाना

  • काँग्रेस नेत्यांनी घेतली एम. के. स्टॅलिन यांची भेट

  • एम. के. स्टॅलिन यांची भेटीनंतर सूचक पोस्ट

Rahul Gandhi Chennai visit : नवी दिल्ली : संपूर्ण देशात डिलिमिटेशन बिलावरून राजकारण रंगले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वाद सुरू आहे. यामध्ये डिलिमिटेशन विधेयकावरून इंडिया आघाडीमध्ये उभी फूट पडत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि डीएमके प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार केला आहे. यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे स्टॅलिन यांना भेटण्यासाठी चैन्नईमध्ये दाखल झाले आहेत.

इंडिया आघाडीतील मित्र पक्षाची मने वळवण्यासाठी काँग्रेस पक्षाने मास्टर प्लॅन आखला आहे. दिल्लीमध्ये न राहता त्यांनी महत्त्वपूर्ण नेत्यांची स्वतः त्यांच्या राज्यात जाऊन भेट घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे राहुल गांधीसह सोनिय गांधी व मल्लिकार्जुन खर्गे हे स्वतः डीएमके प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

चैन्नईच्या या दौऱ्याबाबत राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. राहुल गांधींनी लिहिले, "'इंडिया' (INDIA) आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि मी, थिरू एम. के. स्टॅलिन (Thiru M. K. Stalin) यांची भेट घेण्यासाठी चेन्नईला जात आहोत. आम्ही त्यांना आणि द्रमुक (DMK) पक्षाला विनंती करणार आहोत की, त्यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकांना विरोध करावा."

डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी; 'या' बड्या नेत्याने दिला राजीनामा

"लोकसभेतील जागांची संख्या वाढवून ती ८५० करण्याच्या प्रस्तावामुळे भारतातील लोकशाहीचा अंत होईल. यामुळे भाजप-आरएसएसला भारताचा संपूर्ण निवडणूक नकाशा आपल्या फायद्यानुसार पुन्हा आखण्यासाठी अमर्याद संधी मिळेल. माझे बंधू स्टॅलिन हे नेहमीच तामिळविरोधी शक्तींविरुद्ध खंबीरपणे उभे राहिले आहेत. राष्ट्रीय हितासाठी, तामिळनाडूच्या हितासाठी आणि राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी, आपल्याला मिळून या विधेयकाचा पराभव करायचा आहे."

राहुल गांधी यांनी भेट घेतल्यानंतर स्टॅलिन यांचे मतपरिवर्तन झाल्याची शक्यता आहे. या भेटीनंतर स्टॅलिन यांनी एक्सवर पोस्ट केली. त्यांनी लिहिले, "संविधानाचे रक्षण करण्यामध्ये आणि राज्यांचे अधिकार जपण्यामध्ये द्रमुकची (DMK) ऐतिहासिक भूमिका मान्य केल्याबद्दल भाऊ राहुल गांधी यांचे मनापासून आभार. आम्ही नेहमीच तामिळनाडू आणि आमच्या तामिळ जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रत्येक निर्णय घेतला आहे. आम्ही या मार्गावरून तसूभरही मागे हटणार नाही किंवा कोणतीही तडजोड करणार नाही. मला खात्री आहे की, इतिहास आमची नोंद 'एट्टाप्पन' (विश्वासघातकी) म्हणून नव्हे, तर 'कट्टाबोम्मन' (स्वाभिमानी रक्षक) म्हणून करेल," अशी सूचक पोस्ट स्टॅलिन यांनी केली.

डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवारांचे इंडिया आघाडीतील स्थान काय? राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले...