

डिलिमिटेशन विधेयकाविरोधात राहुल गांधींची पत्रकार परिषद
राहुल गांधींनी शरद पवारांच्या भूमिकेवर व्यक्त केले मत
शरद पवार यांचे इंडिया आघाडीतील स्थानावरून चर्चा
Rahul Gandhi on Sharad Pawar : डिलिमिटेशन बिलावरून राज्यात आणि केंद्रात राजकारण तापले आहे. या विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि ठाकरे गटाने शरद पवार यांच्या राजकारणावर संताप व्यक्त केला. तसेच आव्हानसुद्धा दिले आहे. डिमिलिटेशन बिलाला विरोध दर्शवण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर मत व्यक्त केले.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत डिलिमिटेशनवरून एनडीए सरकारवर निशाणा साधला. तसेच हे बिल व्होटचोरी करण्यासाठी नवा मार्ग असल्याची घणाघाती टीका केली. यावेळीच शरद पवार यांनी सरकाराला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने इंडिया आघाडीमध्ये उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. यावर स्वतः राहुल गांधी यांनी चित्र स्पष्ट केले. शरद पवार यांनी विधेयकाला पाठिंबा दिला तरी त्यांचे इंडिया आघाडीमधील स्थान बदलणार नाही, असे मत राहुल गांधींनी व्यक्त केले.
राहुल गांधी म्हणाले, "भारतीय जनता पक्षाला आम्ही मतचोरीवरुन घेरले, त्यानंतर त्यांनी आता डिलिमिटेशनच्या माध्यमातून निवडणुका चोरण्याचा नवा मार्ग शोधला आहे. देशातील 80 टक्के लोकांचा विश्वास आहे की भाजप निवडणुका चोरते. त्यामुळेच या विधेयकाला आमचा विरोध आहे. मात्र शरद पवार यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला तरी त्यांचे इंडिया आघाडीमधील स्थान बदलणार नाही. त्यांचे इंडिया आघाडीतील स्थान कायम राहणार आहे."
पुढे ते म्हणाले, “डिलिमेटशनच्या माध्यमातून ते 850 जागांवर त्यांना कुठे रंग भरायचे आहेत ते त्यांच्या मताने भरतील. यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होणार आहे. असाच त्यांचा प्लॅन आहे. 850 हा लोकशाहीची हत्या करणारा आकडा आहे. हाच आकडा भारतातील लोकशाही संपवणार आहे, डिलिमिटेशनमुळे 2051 पर्यंत मतदारसंघ फ्रीज केले जातील,” असा घणाघात त्यांनी केला.
Rahul Gandhi Live : 'मत चोरीसाठी नवा प्लॅन...', राहुल गांधींचा डिलिमिटेशनवरून केंद्र सरकारवर निशाणा
डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवार यांनी कोणती भूमिका घेतली आहे?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेवर महाराष्ट्रातील काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे.
शरद पवार यांच्या इंडिया आघाडीतील स्थानाबाबत राहुल गांधी काय म्हणाले?
शरद पवार यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी त्यांचे इंडिया आघाडीतील स्थान कायम राहणार असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी डिलिमिटेशन विधेयकाला विरोध का केला आहे?
डिलिमिटेशनच्या माध्यमातून भाजपला निवडणुकांमध्ये फायदा मिळवण्याची संधी मिळेल, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच २०५१ पर्यंत मतदारसंघ गोठवले जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.