Rahul Gandhi Instagram Story: राहुल गांधींनी शेअर केला रितेश आणि जेनेलिया देशमुख यांचा 'तो' व्हायरल फोटो; सोशल मीडियावर खळबळ

Rahul Gandhi Instagram Story: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्यांच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही जण त्यांना पुन्हा ट्रोल करत आहेत, तर काही जण त्यांना ट्रेंडसेटर म्हणत आहेत.
Rahul Gandhi Shares Riteish and Genelia Deshmukh's Viral Restaurant Photo on Instagram Story
राहुल गांधींनी शेअर केला रितेश आणि जेनेलिया देशमुख यांचा 'तो' व्हायरल फोटो; सोशल मीडियावर खळबळRahul Gandhi Instagram Story
Published on: 
Updated on: 
  • राहुल गांधींच्या बालपणीच्या आठवणीवरून ट्रोलिंग

  • रितेश-जेनेलियाचा खास फोटो आणि कॅप्शन

  • राहुल गांधींची इन्स्टाग्राम स्टोरी आणि संमिश्र प्रतिक्रिया

Rahul Gandhi Instagram Story: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या बालपणातील आपल्या आई सोनिया गांधी आणि वडील दिवंगत राजीव गांधी यांच्या काही आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. आपण लहान असताना वडील घरी असताना जेवणाच्या वेळी सोनिया गांधी या राजीव गांधी यांच्या मांडीवर बसून जेवण करत असल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता. त्यावरुन त्यांना प्रचंड ट्रोलही करण्यात आले.

याला आठवडा उलटत नाही तोच अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांनीही त्यांचा एक फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत जेनेलिया रितेशच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. रितेशने इन्स्टाग्रामवर एक फोटोत तो आणि जेनेलिया एका रेस्टॉरंटमध्ये दिसत आहेत. डायनिंग टेबलवर वेगवेगळे पदार्थ मांडलेले आहेत आणि जेनेलिया रितेशच्या मांडीवर बसून त्याला पिझ्झा भरवत आहे. रितेश देशमुख यांनी या फोटोला एक सुंदर कॅप्शनही दिले आहे, "टेबल दोघांसाठी, पण खुर्ची एकासाठी."

खास बाब म्हणजे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्यांच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही जण त्यांना पुन्हा ट्रोल करत आहेत, तर काही जण त्यांना ट्रेंडसेटर म्हणत आहेत.

प्रतीक गर्ग नावाच्या एका युझरने त्याच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, "राहुल गांधी राजकारणाच्या पलीकडे जाऊन ट्रेंड सेट करत आहेत! रितेश देशमुख आणि जेनेलियासोबतचे गोड क्षण शेअर करण्यापासून ते इंस्टाग्रामवर प्रेम व्यक्त करण्यापर्यंत, राहुल गांधींना लोकांची मने कशी जिंकायची हे चांगलेच ठाऊक आहे. हे खरोखरच ट्रेंडसेटर्सचे युग आहे."

नेमकं प्रकरण काय आहे?

१६ नोव्हेंबर रोजी, नवी दिल्लीत त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी, राहुल गांधींनी त्यांच्या आई-वडिलांच्या नात्याबद्दलच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. राहुल गांधी म्हणाले होते की, त्यांचे आई-वडील एकमेकांवरचे प्रेम उघडपणे व्यक्त करत असत. "जेवताना प्रत्येक वेळी वडील असायचे आणि आई त्यांच्या मांडीवर बसलेली असायची. मला हे अगदी सामान्य वाटायचे. पण जेव्हा मी माझ्या मित्रांच्या घरी जायचो, तेव्हा त्यांच्या आया वडिलांच्या मांडीवर बसलेल्या नसायच्या. मी माझ्या मित्रांना विचारायचो, 'हे काय चाललंय? तुमची आई वडिलांच्या मांडीवर का बसलेली नाही? आम्ही याच वातावरणात वाढलो आहोत.'" यावरून त्यांना खूप ट्रोल करण्यात आले. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने यावर आपली मजेशीर प्रतिक्रिया दिली.

Q

राहुल गांधींनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कोणाचा फोटो शेअर केला आहे?

A

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा एक रेस्टॉरंटमधील व्हायरल फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

Q

रितेश देशमुखने शेअर केलेल्या फोटोमध्ये काय खास आहे आणि त्याचे कॅप्शन काय आहे?

A

रितेश देशमुखने शेअर केलेल्या फोटोमध्ये जेनेलिया रितेशच्या मांडीवर बसून त्याला पिझ्झा भरवताना दिसत आहे आणि या फोटोला रितेशने "टेबल दोघांसाठी, पण खुर्ची एकासाठी" असे कॅप्शन दिले आहे.

Q

या संपूर्ण प्रकारामागे राहुल गांधींच्या कोणत्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ आहे?

A

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी लहानपणी राजीव गांधी घरी असताना सोनिया गांधी त्यांच्या मांडीवर बसून जेवण करत असल्याची आठवण सांगितली होती, ज्यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते; त्यानंतरच रितेश-जेनेलियाचा हा फोटो चर्चेत आला आहे.