maharashtra government has requested the central government to give Bharat Ratna to Ratan Tata
Ratan Tata death news live updates: मुंबई : टाटा समूहाचे सर्वोसर्वा आणि जगातील महत्त्वाचे उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे फक्क भारतामधून नाही तर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा हे फक्त उद्योगपती म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून देखील मोठे होते. प्रत्येक्ष क्षेत्रामध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच देशातील कोणत्याही संकटामध्ये त्यांनी खंबीरपणे देशाच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका बजावली होती. त्यांच्या सुस्वभावी आणि नेतृत्व गुणांमुळे जगभरातून कौतुक केले जाते आहे. रतन टाटा यांनी देशाचे नाव जगभरामध्ये गाजवल्यामुळे आता त्यांना भारतरत्न देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
शिंदे सेनेच्या सोशल मीडियाचे राज्यप्रमुख राहुल कनाल यांनी रतन टाटांना भारतरत्न द्या, अशी मागणी केली आहे. राहुल कनाल यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी रतन टाटांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यासोबतच राहुल कनाल यांनी रतन टाटा यांच्या उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भारतरत्न द्या, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते पत्र देण्यात आले आहे. यावर आता राज्यातील मंत्रिमंडळामध्ये विचार सुरु झाला आहे. मुख्यमंत्री यांनी देखील या पत्राची दखल घेऊन केंद्र सरकारकडे याबाबत मागणी करणारे पत्र लिहिणारे असल्याची माहिती समोर येत आहे.
In today’s meeting, the Maharashtra Cabinet has decided to propose industrialist Ratan Tata’s name for the Bharat Ratna award. A condolence proposal was also passed by Maharashtra Cabinet today. pic.twitter.com/RVKFD4SIjq
— ANI (@ANI) October 10, 2024
पत्रामध्ये नेमकं काय?
राहुल कनाल यांनी पत्रामध्ये लिहिले आहे की, भारतीय व्यवसाय क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यक्ती रतन टाटा यांच्या निधनाप्रती मी दुःख व्यक्त करतो. त्यांचे कॉर्पोरेट क्षेत्रापलीकडे सामाजिक कार्यात मोठे योगदान होते. रतन टाटा हे केवळ दूरदृष्टी असलेले उद्योजकच नव्हे तर एक दयाळू व्यक्तीमत्त्वही होते. त्यांच्या पशूप्रेमाची सर्वांनाच कल्पना आहे. त्यांनी लाखो भटक्या श्वानांची मदत करत त्यांना नवं जीवन दिले होते. त्यासोबच त्यांनी गरजूंसाठी कॅन्सर रुग्णालय उभारले. रतन टाटा यांनी समाजातील अनेक घटकांना निस्वार्थीपणाने मदत केली. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत भरीव योगदान केले आहे. त्यांच्या या योगदानाच्या आधारावर भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कारासाठी रतन टाटांच्या नावाची शिफारस करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करत आहे. रतन टाटा यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केल्याने केवळ त्यांच्या वारसांचा सन्मान होणार नाही, त्यासोबतच असंख्य लोकांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून देशाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत सकारात्मक योगदान देण्यासाठीची प्रेरणा मिळेल. माझा विश्वास आहे की आपल्या समाजात परोपकार आणि करुणा ही संस्कृती वाढवण्यासाठी अशा असामान्य व्यक्तींचा सन्मान करणे आवश्यक आहे. त्यामुळे माझी ही विनंती कृपया विचारात घ्यावी, अशी मागणी राहुल कनाल यांनी केली आहे.