'कैसा हराया' फेम AIMIM ची नगरसेविका सहर शेख नॉटरिचेबल; वडीलही गायब, नगरसेवकपद धोक्यात?
Sahar Shaikh Mumbra AIMIM News Marathi: केवळ ठाण्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठा राजकीय स्फोट झाला आहे. महाराष्ट्रातील ठाणे-मुंब्रा येथे प्रसिद्ध झालेल्या आणि ‘कैसा हराया’ या सोशल मीडियावरील टीकेमुळे चर्चेत आलेल्या नगरसेविका सहार शेख आता त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून वादात सापडल्या आहेत. सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी सहार शेख यांच्यावर त्यांचे वडील युनूस इक्बाल शेख यांच्याकडून बनावट ओबीसी जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप केला आहे. यामुळे एआयएमआयएमच्या नगरसेविका सहर शेख मोठ्या वादात सापडल्या आहेत. तर दुसरीकडे शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आल्यानंतर आता सहर शेख नॅाट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.
वडीलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरुन सहर शेख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सहार शेख आणि वडील युनूस शेख नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. सहार शेख या मुंब्रा प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएम पक्षाच्या नगरसेविका आहेत.मात्र सहर शेख आणि त्यांचे वडील गेल्या काही दिवसांपासून मुंब्य्रात देखील नसल्याची माहिती आहे. शेख कुटुंब जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत अत्यंत गुप्तता पाळली जात आहे. सिद्दीकी यांनी फराह शबाब अहमद या तरुणीने सहर शेख यांच्याबाबत तक्रार केली होती. तक्रार करणारी सिद्दीकी फराह शबाब अहमद ही तरूणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवार होती. प्रभाग क्रमांक ३० मधूनच ती देखील उमेदवार होती.
सहर शेख यांचे वडील युनूस खान यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारदाराच्या विरोधात जात वैधता प्रमाणपत्र चौकशी समितीचा अहवाल लवकरच येणार आहे. यामुळे सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस खान नॅाट रिचेबल आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर त्यांनी माध्यम प्रतिनिधींचे फोन घेणे टाळले आहे. एमआयएमच्या नगरसेविका सहार शेख यांनी महाराष्ट्रात अधिकाऱ्यांची दिशाभूल करून कृत्रिम जात दर्जा मिळवल्याची तक्रार केली आहे. सहार शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवले आहे. निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या सरकारी एजन्सींची दिशाभूल झाली आहे. सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे.
तपासात जात प्रमाणपत्रात अनेक अनियमितता उघड झाल्या आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, जात प्रमाणपत्र सरकारने विहित केलेल्या नमुन्यानुसार नव्हते. याशिवाय, शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रातील नाव, जन्मस्थान आणि इतर तपशिलांमध्ये लक्षणीय तफावत आहे.
कुटुंबाचे मूळ निवासस्थान उत्तर प्रदेश (गाझियाबाद) आहे, जे प्रमाणपत्रावर नमूद आहे, परंतु ओबीसी प्रमाणपत्र महाराष्ट्रातून मिळवले होते. सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे तिने स्वतः दिलेले विधान, कैसे हराया…
यावरून हे स्पष्ट होते की जात प्रमाणपत्र मिळवताना अनेक अनियमितता झाल्या आहेत. यानंतर, संबंधित विभागाने जात प्रमाणपत्र रद्द करण्याची शिफारस केली आहे. जर तपासात जात प्रमाणपत्रासाठी दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे उघड झाले, तर सहार शेख आपले नगरसेवक पद गमावतील.






