निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूका जाहीर 12 मे मतदान होणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
निवडणूक आयोगाने परिपत्रक जारी करुन निवडणूका जाहीर केल्या. महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०९ सदस्यांचा कार्यकाळ, 13 मे 2026 रोजी त्यांची निवृत्ती झाल्यामुळे संपुष्टात येत आहे. यामुळे निवडणूका जाहीर होत असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिलपासून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 30 एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. याचबरोबर 2 मे 2026 पर्यंत अर्जांची छाननी होणार आहे. तसेच 4 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये राजकीय हालचालींना वेग येणार आहे. अनेक इच्छुक हे पक्षश्रेष्ठींसमोर गाऱ्हाणे मांडतील किंवा पुन्हा विधान परिषदेवर संधी मिळण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येणार आहे.
हे देखील वाचा : कोरेगावात शंभूराज देसाईंची ‘चाल’ सुरु; महेश शिंदेंसमोर पर्याय उभा करण्याची रणनिती तापली
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 12 मे 2026 रोजी मतदान केले जाणार आहे. त्याचबरोबर 12 तारखेला सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडून आलेल्या आमदारांची नावे ही त्याच दिवशी म्हणजे 12 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : कराड तालुक्यात प्रभाग रचनेवर 28 गावांतून 66 हरकती दाखल; ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण तापले
कोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपणार?
विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह नीलम गोऱ्हे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजीतसिंग मोहिते पाटील, राजेश राठोड, शशिकांत शिंदे आणि संजय केनेकर यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांमध्ये कोणत्या नेत्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी मिळणार आणि कोणत्या नेत्यांना डच्चू देऊन नव्यांना संधी दिली जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.






