Sanjay Nirupam criticizes Uddhav Thackeray for putting Aurangzeb's photo on Matoshree
मुंबई : राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून जोरदार राजकीय वादंग निर्माण झाला आहे. नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर आता औरंगजेबाच्या कबरीवरुन वातावरण तापले आहे. यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिंदे गटाच्या नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी सामनामधील अग्रलेखातून भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याबाबत वक्तव्य केले. लालकृष्ण आडवाणींची स्थिती पाहिल्यानंतर कैदेतील शाहजहानची आठवण आल्या शिवाय राहत नाही, असे संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहिले आहे. यावरुन आता राजकारण रंगले आहे. राऊतांच्या टीकेवर शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी हल्लाबोल केला आहे. संजय निरुपम म्हणाले की, ते भाजपचे मोठे नेते आहेत. त्यांना कोणीही कैद केलेले नाही, असे निरुपम म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संजय निरुपम म्हणाले की, भाजपाचे बडे नेते लालकृष्ण अडवाणी यांना कोणीही कैद करून ठेवलेले नाही. अडवाणी यांचे वय आता 95 वर्षांपेक्षा अधिक आहे. ते देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते. ते लोकसभेत अखेरपर्यंत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण कॅबिनेट त्यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला जाते. त्यांना कोणीही कैद केले, लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र शासनातर्फे सर्व प्रकारची सुविधा दिल्या जाते. त्यांच्या भेटीगाठीसाठी त्यांच्या इच्छे प्रमाणे कोणीही जाऊ शकतो. त्यांना भेटू शकतो. संजय राऊत यांनी त्यांच्याविषयी जे म्हटले आहे. ते चुकीचे आहे. त्यांनी हा आरोप मागे घ्यावा. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे मत संजय निरुपम यांनी व्यक्त केले आहे.
औरंगजेबाच्या मुद्द्यावर देखील संजय निरुपम यांनी भाष्य केले. मात्र यावर बोलताना त्यांचा ताबा सुटला. त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, औरंगजेब हा आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी आराध्य देव झाल्याचा आरोप त्यांनी केला. तर लवकरच बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ औरंजेबाचा फोटो मातोश्रीवर लागलेला दिसेल, असे वादग्रस्त वक्तव्य संजय निरूपम यांनी केले. यावरुन आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली. यावर संजय निरुपम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या मुलाच्या हात दिशा सालियानचा हत्यामध्ये आहे, असे मला वाटतं. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. दिशा सालियानची वडिलांनी असा सांगितलेला आहे की त्यांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. म्हणजे कोणी वडील असं खोटे बोलू शकत नाही. सतीश सालियान यांची याचिका दाखल करून न्यायालयाने चौकशीचे आदेश देण्यात यावी ही विनंती, असे मत संजय निरुपम यांनी व्यक्त केले आहे.