Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत वाद चव्हाट्यावर ; सातारा नगराध्यक्षपदाच्या मानापमान नाट्याची नाराजी

नगराध्यक्ष पदाच्या मुद्द्यावरून मनोमिलनांमध्ये टोकाचा स्नेह ताणला गेलेला असताना अचानक बाबाराजे समर्थक अमोल मोहिते यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची माळ पडली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 20, 2025 | 04:56 PM
Satara News : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत वाद चव्हाट्यावर ; सातारा नगराध्यक्षपदाच्या मानापमान नाट्याची नाराजी
Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत वाद चव्हाट्यावर
  • सातारा नगराध्यक्षपदाच्या मानापमान नाट्याची नाराजी
सातारा : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. नगराध्यक्ष पदाच्या मुद्द्यावरून मनोमिलनांमध्ये टोकाचा स्नेह ताणला गेलेला असताना अचानक बाबाराजे समर्थक अमोल मोहिते यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची माळ पडली. त्यावरून सातारा विकास आघाडीच्या अपेक्षांना जोरदार धक्का लागला आणि उदयनराजे समर्थक संग्राम बर्गे यांना राजकीय संधीने हुलकावणी दिली. त्यामुळे अजूनही सातारा विकास आघाडीच्या कोर्टामध्ये राजकीय शांतता आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मनात नक्की काय सुरू आहे, याची समर्थकांमध्ये चलबिचल वाढली आहे. या संपूर्ण प्रकरणावर उदयनराजे भोसले यांनी कोणतीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. कार्यकर्त्यांमध्ये टोकाचा अंतर्गत आंतरविरोध पाहायला मिळतो आहे. शहराच्या पश्चिम भागामध्ये उमेदवारांचे बॅनर लागू लागले आहेत. त्यावरून उदयनराजे भोसले यांचा फोटो गायब झाला आहे. सातारा विकास आघाडीने यंदाच्या निवडणुकीत 18 महिला उमेदवार आणि 7पुरुष उमेदवार दिले आहेत. त्यामुळे निवडून आल्यानंतर सभा कामकाज चालवण्याची मोठी जबाबदारी पुन्हा एकदा अ‍ॅड. दत्तात्रय बनकर व . पक्षप्रतोत निशांत पाटील यांना चालवावी लागणार आहे. त्यानंतर प्रभाग 11 मधून अपक्ष निष्ठा व्यक्त करणारे वसंत लेवे यांनी गुलाल आपलाच आहे, असा दावा केला आह. ते निवडून आल्यास सातारा विकास आघाडीची बाजू भक्कम होणार आहे.

Political News : महाराष्ट्रात गुन्हेगारांना मिळतोय राजाश्रय? पत्नीला जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी

सध्याची राजकीय शांतता ही वादळापूर्वीची तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपाने साताऱ्यात पक्षीय ध्येयधोरण जरी राबवले तरी खऱ्या अर्थाने आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आघाड्यांचे राजकारण सुरू झाले आहे. म्हणून 50 उमेदवारांना 50 अपक्षांनी आव्हान दिल्याने साताऱ्याचे राजकारण नक्की कोणत्या वळणावर जाणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

अपक्ष उमेदवारांना रसद पुरवण्याचा छुपा अजेंडा ?

जलमंदिर येथे सातारा विकास आघाडीच्या कार्यकत्यांची तातडीची बैठक बोलवण्यात आल्याची माहिती आहे. सातारा विकास आघाडी अपक्षांना रसद पुरवण्याचा छुपा अजेंडा राबवणार तर नाही ना, याची भीती आता शिवेंद्रराजे समर्थकांना वाटत आहे. कारण उदयनराजे यांचा गनिमी कावा आणि धक्कातंत्र हे संपूर्ण सातारा शहराला ठाऊक आहे. एका रात्रीत प्रभागाची समीकरणे फिरवण्यात उदयनराजे यांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यामुळे उदयनराजे यांची चुप्पी बऱ्याच राजकीय प्रश्नांना जन्म देत आहे.

साताऱ्याचा बच्चन सायलेंट मोडवर..! खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांचे समर्थक आवडीने साताऱ्याचा बच्चन म्हणतात. पुष्पा चित्रपटातल्या अल्लू अर्जुन प्रमाणे झुकेगा नही साला अशी सिग्नेचर अ‍ॅक्शन करत उदयनराजे यांचा दबंग अंदाज नेहमीच पाहायला मिळतो, मात्र उदयनराजे यांच्या आवडीचा खांदा कार्यकर्ता नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून अचानक बाहेर पडल्यापासून उदयनराजे सायलेंट मोडवर आहेत. कदाचित त्यांची नाराजी व्यक्त करायला ही वेळ नाही आणि व्यासपीठही नाही. नगरपालिका निवडणुकीची धामधूम असल्याने उदयनराजे यांनी कोणतीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

Maharashtra Politics: भाजपमध्ये बंड! ’13 सच्चे कार्यकर्ते’ निवडणुकीच्या रिंगणात; राजकारणात भूकंप

Web Title: Satara news internal dispute on the rise in the backdrop of elections displeasure over the humiliation drama of the post of satara mayor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 04:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.