विशाल रिकी काकडे चिखली मधून एनसीपी अजित पवार गटाची उमेदवारी मिळाली आहे
चिखली शहरामध्ये काही दिवसांपूर्वी गुन्हेगाराची घटना समोर आली होती. पतीचे बाहेर अफेअर असल्याचा संशय पत्नीने व्यक्त केला होता. मात्र सदर व्यक्तीला पत्नीने जाब विचारल्यामुळे पतीने थेट तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर संपूर्ण चिखली शहरात खळबळ माजली होती. पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकणारा काँग्रेसचा युवा शहर अध्यक्ष आहे. आता त्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे. यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कोणत्या मार्गावर चालली आहे असा प्रश्न पडला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या विशाल उर्फ रिकी काकडे असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी नमिता काकडेने 9 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर विशाल काकडेला अटक करण्यात आली. तो अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र विशाल काकडेने न्यायालयाच्या परवानगीने नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 13 अ मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल काकडेने न्यायालयीन कोठडीत असताना पोलीस संरक्षणात येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र यामुळे राजकारणामध्ये गुन्हेगारांना संधी दिली जात असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजकारणामध्ये गुन्हेगार सामील होत असल्याचे दिसून येत असून तुळजापूरमधील प्रकरण देखील ताजे आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला भाजपाकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. राज्यभर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीलाच भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरण उजेडात आणायला विनोद गंगणे यांचीच मदत झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.






