दीपेश म्हात्रे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावू नका..., शिंदे गटाच्या आमदारांची दीपेश म्हात्रेंवर टीका (फोटो सौजन्य-X)
शिंदे गटाला सोडून डोंबिवलीतील दीपेश म्हात्रे हे आपले बंधू जयेश म्हात्रे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मात्र डोंबिवलीत एकीकडे दीपेश म्हात्रे प्रवेशासाठी निघाले तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. ज्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ कोणी जाहिरात किंवा बॅनर लावू नये असा फतवा काढला गेला आहे. तर दुसरीकडे एखादा पदाधिकारी गेल्यामुळे शिंदे गटाला त्याचा काही फरक पडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे असताना असे काही भगदाड पडत नाही असे, विधान कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.
डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना प्रदेश सचिव व माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे त्यांचे बंधू जयेश म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. शिंदे गटाला मोठा धक्का मानला जातो. दीपेश म्हात्रे हे खासदार शिंदे याचे निकटवर्तीय होते. मात्र विधानसभा निवडणूकीत बंडखोरी करण्यापेक्षा त्यांनी ठाकरे गटात जाणे पसंत केले आहे. त्यामुळे डोंबिवलीचे राजकारण चांगलेच तापले आहे. दिपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली जाते की नाही हा देखील प्रश्न आहे.
डोंबिवलीतल निष्ठावंत शिवसैनिकांना विश्वासात घेऊन पक्षाच्या नेत्यांना हा निर्णय घ्यायचा आहे. येत्या काही दिवसात दीपेश म्हात्रे यांची रणनिती आणि भवितव्य काय असेल हे कळेल. त्यांचा ठाकरे गटात प्रवेश केल्याची बातमी समोर येताच डोंबिवली पूर्वेतील ठाकूर्ली परिसरात एक बॅनर लावला गेला. त्यावर लिहिले होते की, सर्वांना कळविण्यात येते की, दीपेश म्हात्रे यांचे कुठल्याही प्रकारचे जाहिरात किंवा बॅनर लावण्यास चोळे गाव व ठाकूर्ली हद्दीत सक्त मनाई आहे. चोळेगाव ग्रामस्थ मंडळ हा बॅनर लावल्याचा त्यावर उल्लेख आहे. दुसरीकडे दीपेश म्हात्रे यांच्यावर कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी टिका केली आहे. शिवसेना ही मोठी संघटना आहे. एका दोघांमुळे चालत नाही. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार शिंदे आहेत आम्ही हजारो पाईक आहोत त्यांचे. एक पदाधिकारी गेल्याने अजिबात काही भगदाड पडत नाही अशी टिका केली आहे.