Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात; गाडीच्या पुढच्या भाग झाला चक्काचूर

शिवसेना शिंदे गटाचे नेते व यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. यवतमाळमधील कोपरा या गावाजवळ हा अपघात झाला आहे. संजय राठोड यांच्या कारचा हा अपघात एवढा भीषण होता की गाडीच्या पुढच्या भागाचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 04, 2024 | 09:56 AM
पालकमंत्रिपदाकडे लागले लक्ष

पालकमंत्रिपदाकडे लागले लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ :  शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यवतमाळचे पालकमंत्री असलेल्या संजय राठोड यांच्या गाडीचा मध्यरात्री 2 च्या सुमारास भीषण अपघात झाला. अपघात झाला तेव्हा संजय राठोड त्यांच्या कारमध्ये नव्हते. ते दुसऱ्या एका कारने मागून येत होते. त्यांची ही कार पुढे निघाली होती. त्यामुळे संजय राठोड हे बचावले गेले.

यवतमाळमधील कोपरा या गावाजवळ हा अपघात झाला आहे. संजय राठोड यांच्या कारचा हा अपघात एवढा भीषण होता की गाडीच्या पुढच्या भागाचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे. कारने समोरच्या पिकअप व्हॅनला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. रस्त्यावरून दोन्ही गाड्या वेगाने जात असताना पिकअप व्हॅननं अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून कारची जोरात धडक बसली. या अपघातात पिकअप व्हॅन पलटी झाली. यात पिकअप व्हॅनचा चालक जखमी झाला असून अपघातानंतर त्यांना उपचारांसाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे देखील वाचा : माची परिसरातील स्फोट प्रकरणी पोलीस ॲक्शनमोडमध्ये; मृताच्या दोन भावांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पोहरा देवीच्या दर्शनासाठी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पालकमंत्री असलेले संजय राठोड यवतमाळहून वाशिममधील पोहरादेवी येथे दौऱ्यावर गेले होते. येताना त्यांच्या या गाडीचा अपघात झाला आहे. राठोड हे अपघात झालेल्या गाडीमधूनच प्रवास करणार होते. मात्र, ऐनवेळी ते एका पाहुण्यांच्या कारमधून निघाले. त्यामुळे कार पुढे निघाली. मागून संजय राठोड यांची कार येत होती. काही मिनिटांतच संजय राठोड प्रवास करत असलेली कार त्या ठिकाणी पोहोचली. कार बदलल्यामुळे संजय राठोड थोडक्यात बचावले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (दि.05) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान घोडबंदर येथील कासारवडवली भागात दौऱ्यावर येणार आहेत. कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. मागील आठवड्यामध्ये देखील नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र मुसळधार पावसामुळे मोदींचा हा दौरा ऐनवेळी रद्द झाला. पंतप्रधान मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर सुद्धा येणार असून पोहरा देवीचे ते दर्शन घेणार आहेत.

Web Title: Shivsena sanjay rathod car terrible accident near kopra village in yavatmal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 09:56 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.