Local Body Elections 2025: अखेर बहुप्रतिक्षीत महापालिका व नगरपालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने निवडणुकीच्या हालचालींना अधिकृत सुरुवात केली आहे. गुरुवारी नगरविकास विभागाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. या पार्श्वभूमीवर निवडणुका येत्या दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. शहरी भागांसोबतच ग्रामीण भागातही प्रचाराची तयारी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमध्ये संपर्क मोहिमा सुरू केल्या आहेत. राज्यात अनेक महापालिका व नगरपालिका निवडणुका दीर्घ काळापासून रखडल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर व सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशामुळे सरकारला प्रभाग रचनेसंबंधीची प्रक्रिया हाती घ्यावी लागली.
Todays Gold-Silver Price: सोन्याने पार केला 1 लाखांचा टप्पा, चांदीचे दरही वधारले!
राज्यातील महापालिका व नगरपालिकांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पूर्ण होण्याची शक्यता आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले असून, ही संपूर्ण प्रक्रिया ९ टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत मुंबई महापालिकेसह अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना घोषित करण्यात येणार आहे. प्रभाग रचना सप्टेंबरमध्येच पूर्ण होत असल्याने ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याची शक्यता कमी असून, त्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात, असे संकेत मिळाले आहेत.
Devendra Fadnavis: “डोंगरावरील झोपडपट्ट्यांच्या…”; CM देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता
राज्यातील महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचना अंतिम टप्प्यात आली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग हळूहळू मोकळा होत आहे. नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत जाहीर करण्यात येईल. तर ड दर्जाच्या महापालिकांची प्रभाग रचना २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान निश्चित केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना देखील २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध केली जाईल. यानंतर काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.