Manoj Jarange News:
Manoj Jarange press conference: भाजपमधील अनेक मराठा नेत्यांना त्रास दिला जात आहेत. आतापर्यंत मला ३०-३२ आमदार खासदारांचे फोन आलेत,” असा खळबळजनक दावा करत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे यांनी अहिल्यानगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुणे ते नागपूर प्रवास होणार सुपर फास्ट; PM मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा कंदील
भाजपमधील मराठा नेत्यांची अस्वस्थता सांगत जरांगे पाटलांनी एकच खळबळ उडवून दिली. पण जरांगे पाटील यांच्या या दाव्यावर अद्याप भाजपकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. त्यामुळे भाजपच्या प्रतिक्रीयेकडे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मला भाजपमधील अनेक नेते फोन करून त्यांना भाजपमध्ये त्रास दिला जात असल्याचे सांगत आहेत. मला आतापर्यंत 30-32 आमदार-खासदारानी फोन करून त्यांची आपबिती सांगितली आहे.”, असा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस मराठा नेते आणि अधिकाऱ्यांना संपवण्याचे काम करत आहेत, असा धक्कादायक दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक मंत्र्यांना स्वत:चे OSD दिले आहेत. भाजप वेगळा असतानाही फडणवीस यांनी पक्षाची दिशा बदलली आहे. सत्तेसाठी त्यांनी नारायण राणे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण यांसारख्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये घेतले. इतकचं नाही तर भाजपमधले नेतेही संपवण्याचं काम सुरू असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.
सत्तेसाठी आपल्या लोकांना दूर सारण्याचे काम सुरू असून, त्याची यादी माझ्याकडे आहे. जालना, सोलापूर आणि नांदेड येथे अनेक मराठा नेत्यांना त्रास दिला जात आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच, “आमची परिस्थिती बिकट आहे” असे सांगणारे अनेक नेते दररोज माझ्याशी संपर्क साधत आहेत, असा दावा त्यांनी केला.
मराठा आरक्षणासाठीचा लढा आणखी तीव्र करण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे असून, त्याशिवाय इतर कोणतेही आरक्षण आम्ही स्वीकारणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच, 29 ऑगस्टला ठरवलेल्या ‘चलो मुंबई’ या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अंतिम निर्णय समाजच घेईल. याबाबत मी स्वतः कोणताही अक्रस्ताळा हस्तक्षेप करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. समाजाला जो निर्णय योग्य वाटेल, तोच तो घेईल. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.