पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते पुणेच्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला आहे (फोटो - एक्स)
Nagpur to Pune Vande Bharat : नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर ते सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे पर्यंतचा प्रवास अतिशय जलद गतीने करता येणार आहे. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा कंदील दाखवला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
नागपूर (अजनी) ते पुणे दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आज सुरू करण्यात आली. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त रेल्वेने विशेष तयारी केली होती. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात प्रवाशांची आणि मुलांची भेट घेतली. या दरम्यान, त्यांनी वंदे भारतच्या अत्याधुनिक सुविधांबद्दलही चर्चा केली. यावेळी चिमुकल्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, नवीन वंदे भारत एक्सप्रेस नागपूर आणि पुणे दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट करेल. हाय स्पीड, आधुनिक डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही ट्रेन प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देईल. या सेवेमुळे दोन्ही शहरांमधील व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला एक नवीन आयाम मिळण्याची अपेक्षा आहे, अशी अपेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तीन वंदे भारतचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी बेंगळुरूमधील केसीआर रेल्वे स्टेशनवरून तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये बेंगळुरू ते बेळगाव, अमृतसर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि नागपूर (अजनी) ते पुणे या गाड्यांचा समावेश आहे. या हाय-स्पीड गाड्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ करतील, प्रवासाचा वेळ कमी करतील आणि प्रवाशांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देणार आहेत. प्रवाशांचा प्रवास या मुळे सुखकर होणार असून प्रवाशांच्या संख्येमध्ये देखील वाढ होईल. वंदे भारतमुळे पुणे ते नागपूर प्रवास सहज व सुलभ होणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली होती. एका एक्स पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की ते १० ऑगस्ट रोजी बंगळुरूच्या लोकांमध्ये येण्याची वाट पाहत आहेत. केएसआर रेल्वे स्टेशनवरून ३ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू होतील, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारेल. बंगळुरूच्या शहरी पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी बंगळुरू मेट्रोच्या यलो लाईनचे उद्घाटन केले जाईल. बंगळुरू मेट्रो फेज-३ चा पायाभरणी कार्यक्रम आयोजित केला जाईल. शहरात एका सार्वजनिक कार्यक्रमालाही संबोधित केले जाईल.
यलो लाईनचे उद्घाटन केले
पंतप्रधान मोदी दुपारी १ वाजता बंगळुरूमध्ये शहरी कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. ते बंगळुरू मेट्रो फेज-२ प्रकल्पांतर्गत आरव्ही रोड (रागीगुड्डा) ते बोम्मासंद्रा पर्यंतच्या यलो लाईनचे उद्घाटन करतील. या लाईनची लांबी १९ किमीपेक्षा जास्त आहे आणि त्यात १६ स्थानके आहेत. यावर सुमारे ७,१६० कोटी रुपये खर्च केले जातील.
🚄 Little Passengers, Big Smiles!
Interacted with little schoolchildren travelling on the Nagpur–Pune Vande Bharat Express. Their beaming smiles and eager conversations turned into a truly special moment.@narendramodi #Maharashtra #Nagpur #VandeBharatExpress pic.twitter.com/r0DQP64ddq
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 10, 2025
या यलो लाईनच्या उद्घाटनासह, बेंगळुरूमधील मेट्रोचे ऑपरेशनल नेटवर्क ९६ किमी पेक्षा जास्त होईल आणि या प्रदेशातील मोठ्या लोकसंख्येला सेवा देईल. पंतप्रधान मोदी १५,६१० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या बेंगळुरू मेट्रो फेज-३ प्रकल्पाची पायाभरणी देखील करतील.