चिपळूण/निसार शेख : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूकीच्या या रिंगणात आता मित्रपक्षात हेवेदावे होत असल्यास पाहायला मिळत आहे. मित्रपक्षांमधील महायुतीबाबत चर्चा सुरू असली तरी जर युती झाली नाही, तर चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या 9 गटांमध्ये आणि पंचायत समितीच्या 18 गटांमध्ये पक्ष आपले उमेदवार उतरवणार आहे.
हा महत्त्वपूर्ण निर्णय आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सावर्डे येथील बैठकीत महायुतीमधील यांच्यातील अपेक्षित युती आणि वाटाघाटी निष्फळ ठरल्या, तर दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली जाईल. मात्र वरिष्ठ नेते व पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करण्याचे मत यावेळी एकमुखाने मांडण्यात आले. आमदार शेखर निकम म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून आपण तालुक्यात सर्व स्तरांवर विकासकामे केली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी मिळून कोकणासह संपूर्ण राज्यात जलदगतीने विकास घडवून आणला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास ठेवावा. वरून महायुतीबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत आणि त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र जर कोणत्याही कारणास्तव युती न झाल्यास राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. बैठकीस प्रांतिक उपाध्यक्ष शौक मुकादम, सरचिटणीस जयंद्रत खता तालुका अध्यक्ष अबू ठसाळे, विधानस क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, दादा साळ विजय गुजर, सुरेश खापले, शरद शिगन महिला जिल्हाध्यक्ष पूजाताई निक दिशा दाभोळकर, शहराध्यक्ष मि कापडी, माजी सभापती सूर्यकांत खे मोहन शिंदे, अॅड. अमित कदम, दा दाभोळकर, दिलीप माटे, सुधीर भो रवी तंबिटकर, माजी सभापती कांबळे यांच्यासह पदाधिकारीम संख्येने व कार्यकर्ते उपस्थित होते.