प्रत्येक राशीचा राजयोग नक्की कसा तयार होतो याबाबत अधिक माहिती
असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राजयोग तयार होतो त्याला सर्व सुख प्राप्त होते. अशा परिस्थितीत कोणता ग्रह कोणत्या राशीच्या व्यक्तीला राजाप्रमाणे सुख देतो आणि कुंडलीत राजयोग आहे की नाही हे कसे जाणून घ्यायचे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. सगळ्याच राशीच्या व्यक्तींना राजयोग असतो की नाही हे मात्र नक्कीच सर्वांना विचारावे वाटते. मात्र कुंडलीत कुठला ग्रह कोणत्या राशीत असेल तर हा राजयोग तयार होतो याचा एक अभ्यास आहे.
ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी योग्य अभ्यास करत कोणत्या कुंडलीत राजयोग तयार होऊ शकतं याचं योग्य गणित मांडलं आहे आणि याचा अधिक अभ्यास करत आम्ही तुम्हाला या लेखातून राजयोगाबाबत सांगत आहोत. तुमच्या कुंडलीत असा ‘राजयोग’ तयार होतोय की नाही नक्की पहा (फोटो सौजन्य – iStock/Pinterest)
मेष रास – मेष राशीच्या कुंडलीत मंगळ आणि गुरूची स्थिती बलवान असेल. तसेच हे दोन्ही ग्रह दहाव्या भावात असल्यास कुंडलीत राजयोग तयार होतो. ज्याच्या कुंडलीत हे दोन्ही ग्रह अशा स्वरूपात असतील त्यांनी नक्कीच तयारीला लागा
वृषभ रास – वृषभ राशीच्या व्यक्तीच्या कुंडलीत नवव्या आणि दहाव्या घरात शुक्र आणि शनीची स्थिती मजबूत असेल तर त्या व्यक्तीच्या कुंडलीत राजयोग तयार होतो
मिथुन रास – मिथुन राशीच्या लग्न कुंडलीत बुध आणि शनि हे ग्रह 9 व्या आणि 10 व्या भावात एकत्र आल्यावर कुंडलीत राजयोग तयार होतो
Baba Vanga Predictions: बाबा वेंगाची 2025 साठी धोकादायक भविष्यवाणी, विनाशाच्या सुरूवातीचे दिले संकेत
कर्क रास – कर्क राशीच्या लोकांच्या लग्न कुंडलीत जेव्हा चंद्र आणि गुरु भाग्य आणि कर्म घरामध्ये असतात तेव्हा तो राजयोगाचा कारक असतो
सिंह रास – सिंह राशीच्या लग्न कुंडलीत 9व्या आणि 10व्या घरात सूर्य आणि मंगळ चांगल्या स्थितीत असतील तर कुंडलीत राजयोग तयार होतो
कन्या रास – कन्या राशीच्या लोकांच्या कुंडलीत जेव्हा बुध आणि शुक्र भाग्य आणि कर्माच्या घरात अर्थात 9व्या आणि 10व्या घरात एकत्र असतात तेव्हा राजयोग तयार होतो
तूळ रास – तूळ राशीच्या लोकांच्या कुंडलीत नवव्या आणि दहाव्या घरात शुक्र आणि बुध एकत्र येतात, तर अशा व्यक्तीला जीवनात राजयोगाचे सुख प्राप्त होते
वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या लोकांच्या कुंडलीत नवव्या आणि दहाव्या स्थानात सूर्य आणि मंगळ एकत्र असल्यास राजयोगाची स्थिती निर्माण होते. तसेच जेव्हा कुंडलीत चंद्र आणि मंगळ मजबूत स्थितीत असतात तेव्हा शुभ परिणाम मिळण्याची शक्यता असते
धनु रास – धनु राशीच्या लोकांसाठी नवव्या किंवा दहाव्या भावात गुरु आणि सूर्य एकत्र असतील तर अशा स्थितीत कुंडलीत राजयोग तयार होतो
मकर रास – मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीत जेव्हा शनि आणि बुध कर्म किंवा भाग्याच्या घरात एकत्र असतात तेव्हा कुंडलीत राजयोग कारक तयार होतो
कुंभ रास – कुंभ राशीच्या लोकांच्या कुंडलीत भाग्य आणि कर्माच्या घरात शुक्र आणि शनि हे ग्रह असतात तेव्हा अशा लोकांचे आयुष्य राजासारखे व्यतीत होते
2025 मध्ये सूर्यग्रहण आणि शनि गोचर दुर्लभ योग, ३ राशींचे नशीब उघडणार; पैशांची सरबत्ती होणार
मीन रास – मीन राशीच्या लोकांच्या कुंडलीत नवव्या आणि दहाव्या भावात गुरु आणि मंगळ एकत्र असतात तेव्हा ही स्थिती राजयोग निर्माण करते
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.