बाबा वेंगाची नववर्षासाठी भविष्यवाणी
जगप्रसिद्ध पैगंबर बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी सध्या चर्चेत आहे. भूतकाळात त्यांनी केलेले भाकीत नेहमीच सत्याच्या जवळ गेले आहे आणि खरेही ठरले आहे. आता लवकरच नवीन वर्ष येणार आहे. ज्योतिषी आणि तज्ज्ञांच्या मते नवीन वर्ष 2025 खूप खास असणार आहे. नवीन वर्षाच्या संदर्भात बाबा वेंगा यांनी केली काही खास भविष्यवाणी, जाणून घ्या काय आहेत त्या भविष्यवाणी आणि कसा लावलाय अंदाज.
वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा हे मूळ नाव असणारे बाबा वेंगा या नावाने अधिक प्रसिद्ध झाल्या होत्या. एक बल्गेरियन गूढवादी आणि वनौषधीशास्त्रज्ञ होत्या असे मानले जाते. लहानपणापासूनच अंध असून त्यांचे बहुतांश आयुष्य बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या रुपीट भागात गेले असे सांगण्यात येते. तर 1970 आणि 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी केलेली अनेक भाकिते प्रसिद्ध झाली आणि तसेच घडलेही आहे. याशिवाय पुढील अनेक वर्षाचे भाकित त्यांनी नमूद करून ठेवले आहे (फोटो सौजन्य – Instagram)
युरोपमध्ये भयंकर युद्ध
बाबा वांगाच्या 2025 च्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत युरोपमध्ये भयंकर युद्ध होण्याची शक्यता आहे आणि राजकीय अस्थिरता देखील दिसू शकते. युरोपमध्ये होत असलेल्या संघर्षाचा निसर्गावर खोलवर परिणाम होऊ शकतो. लोकसंख्येमध्ये मोठी घट देखील दिसू शकते. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील कर्करोगाने त्रस्त असलेल्या लोकांना 2025 मध्ये वैज्ञानिकांच्या मदतीने या जीवघेण्या आजारापासून मुक्ती मिळू शकते. 2025 मध्ये, मानव एलियन्सच्या शोधात मोठे यश मिळवू शकतात. बाबा वेंगा यांनीही दावा केला आहे की, पुढील वर्षभरात ‘विनाश सुरू होऊ शकतो’.
2025 मध्ये सूर्यग्रहण आणि शनि गोचर दुर्लभ योग, ३ राशींचे नशीब उघडणार; पैशांची सरबत्ती होणार
काय ठरले खरे
1996 मध्ये त्यांच्या मृत्यूपूर्वी, बाबा वेंगा यांनी 5079 पर्यंत भविष्यवाणी केली होती आणि आजपर्यंत त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. याचे उदाहरण पहायचे झाल्यास, 2001 मध्ये अमेरिकेत 9/11 च्या हल्ल्याबद्दल त्यांनी आधीच सांगितले होते की “भयानक, भयपट! अमेरिकन बांधवांना स्टीलच्या पक्ष्यांच्या हल्ल्यानंतर त्रास होईल”, 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनाबद्दलची भविष्यवाणी देखील खरी ठरली होती
5079 पर्यंत केलीये भविष्यवाणी
बाबा वेंगा यांना बल्गेरियन पैगंबर म्हणूनही ओळखले जाते आणि त्यांचा जन्म रशियाच्या ओट्टोमन साम्राज्यात 1911 मध्ये झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी वादळामुळे त्यांची दृष्टी गेली, त्यामुळे त्यांना आयुष्यभर आंधळे राहावे लागले.
एक तेजस्वी भविष्यवेत्ता म्हणून जगभर त्यांची ओळख झाली. बाबा वेंगा यांनी सन 5079 पर्यंतची भविष्यवाणी केली आहे. 1996 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र आजही दरवर्षी बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीच्या बाबतीत चर्चा होत राहते. विशेषतः नवे वर्ष सुरू होण्यापूर्वी बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीच्या बाबतीत जगभरात संवाद आणि चर्चा होताना दिसून येते.
2025 मध्ये शुक्र-शनिसह 4 ग्रह चालणार उलटे, या राशींसाठी ठरणार राजयोग ‘सुवर्णकाळ’
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.