फोटो सौजन्य- pinterest
अश्विन पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होते. अश्विन पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि संध्याकाळी देवी लक्ष्मीसोबत चंद्राची पूजा केली जाते. यावेळी अश्विन पौर्णिमा आणि स्नान दान करण्यासाठी दिवस वेगवेगळे आहेत. अश्विन पौर्णिमेला स्नान दान केल्याने पाप दूर होऊन पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. अश्विन पौर्णिमा कधी आहे आणि स्नान दानाची वेळ जाणून घ्या
पंचांगानुसार यावेळी सोमवार 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.23 मिनिटांनी अश्विन पौर्णिमेची सुरुवात होणार आहे. या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.16 वाजता होईल. या दिवशी ब्रम्ह मुहूर्त पहाटे 4.39 ते 5.28 पर्यंत आहे. तर अभिजित मुहूर्त सकाळी 11.45 ते दुपारी 12.32 पर्यंत आहे. निशिता मुहूर्त दुपारी 11.45 ते 12.34 पर्यंत आहे.
या दिवशी सकाळी वृद्धी योग सकाळपासून दुपारी 1.24 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर ध्रुव योग असेल. उत्तर भाद्रपद नक्षत्र सकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटे 4.1 वाजेपर्यंत प्रभावी राहील. त्यानंतर रेवती नक्षत्र सुरु होईल.
अश्विन पौर्णिमेचे व्रत सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी पाळले जाईल. अश्विन पौर्णिमेच्या व्रताच्या वेळी रात्री चंद्राला नैवेद्य दाखवला जातो. त्याशिवाय अश्विन पौर्णिमेचे व्रत अपूर्ण मानले जाते.
भद्रा आणि पंचक हे देखील अश्विन पौर्णिमेच्या दिवशी असणार आहे. भद्राची सुरुवात दुपारी 12.23 वाजता होईल आणि रात्री 10.53 पर्यंत राहील. यावेळी भद्रा पृथ्वीवर राहते म्हणून या काळात कोणतेही शुभ कार्य करण्याचे टाळावे. पंचक संपूर्ण दिवस राहील.
अश्विन पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 5.27 वाजता चंद्र उगवेल. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.14 वाजता चंद्रास्त होईल.
7 ऑक्टोबर रोजी अश्विन पौर्णिमेला स्नानासाठी ब्रह्म मुहूर्त पहाटे 4.39 ते 5.28 पर्यंत आहे त्यानंतर दान करता येऊ शकते. या दिवसासाठी सर्वोत्तम वेळ 9.13 ते दुपारी 1.37 पर्यंत राहील. तर अमृत-सर्वोत्तम मुहूर्त दुपारी 12:09 ते दुपारी 01:37 पर्यंत असेल.
अश्विन पौर्णिमेच्या दिवशी उपवास, प्रार्थना, स्नान आणि दान केल्याने आनंद, शांती आणि समृद्धी मिळते. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपत्ती आणि समृद्धी वाढते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)