फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती वेळोवेळी बदलत राहते आणि या बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसून येतो. येणारा काळ म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना ज्योतिषशास्त्रानुसार खूप खास आहे. कारण या काळामध्ये गुरु, राहू आणि मंगळ एका विशेष त्रिकोणी स्थितीत येणार आहेत. या योगाला काम त्रिकोण राजयोग म्हणून ओळखले जाते. या काळात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी, व्यवसाय, विवाह आणि आर्थिक लाभ यासारख्या गोष्टींमध्ये तुमची अचानक प्रगती होऊ शकते.
सध्या राहू कुंभ राशीत असल्याने गुरु मिथुन राशीत आणि मंगळ तूळ राशीत आहे. हे तिन्ही ग्रह तिसऱ्या, सातव्या आणि अकराव्या घरात असल्याने काम त्रिकोण योग तयार होत आहे. ज्याचा संबंध एखाद्याची इच्छा पूर्ण करण्याशी संबंधित आहे. 28 सप्टेंबर रोजी मंगळ तूळ राशीमध्ये प्रवेश करेल. ज्यामुळे ही युती आणखी शक्तिशाली होईल. ही शुभ युती सुमारे एक महिना म्हणजेच 27 ऑक्टोबरपर्यंत राहील. या काळामध्ये ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती सक्रिय आहे त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.
ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडलीतील तिसऱ्या, सातव्या आणि अकराव्या घरामध्ये काम त्रिकोण म्हणतात. हे तिन्ही भाव एकत्रितपणे “काम” चे प्रतिनिधित्व करतात, म्हणजे इच्छा आणि प्रयत्न. तिसरे घर कठोर मेहनत धैर्य, संवाद, लहान सहली दर्शवते, सातवे घर विवाह, भागीदारी, जोडीदार, व्यवसाय दर्शवते आणि अकरावे घर नफा, आकांक्षा, नेटवर्क आणि यश दर्शवते. ज्यावेळी गुरु, शुक्र, मंगळ हे तिन्ही घरात स्थित असतो आणि त्याचा संबंध कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेला असतो त्याला कामत्रिकोण योग म्हणतात.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर ठरणार आहे. गुरु ग्रह सध्या तुमच्या कुंडलीमध्ये दहाव्या घरात असल्याने करिअर, प्रतिष्ठा आणि व्यावसायिक प्रगतीचे प्रतिनिधित्व करतो. तर मंगळ दुसऱ्या घरात आणि राहू सहाव्या घरात आहे. या तीन ग्रहांमुळे कामत्रिकोण योग तयार होईल. यामुळे नोकरीच्या संधी, परदेशातील संधी आणि आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरु शकतो.
राहू, मंगळ आणि गुरूचा त्रिकोणी युती धनु राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. सध्या राहू पाचव्या घरात, गुरू सातव्या घरात आणि मंगळ अकराव्या घरात आहे. यामुळे कामत्रिकोण योग तयार होणार आहे. ज्यामुळे अचानक आर्थिक लाभ, व्यवसायात प्रगती आणि नवीन शक्यता निर्माण होतात. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक समस्यांना तोंड देत आहेत त्यांना यावेळी दिलासा मिळू शकेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील.
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे. हा ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये दहाव्या घरात असेल तर गुरु सहाव्या घरात आणि राहू दुसऱ्या घरात आहे. हे तिन्ही ग्रह मिळून कामत्रिकोण योग तयार होणार आहे. यामुळे जीवनातील अनेक क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येतील. स्पर्धा परीक्षा, नोकरी आणि सेवा क्षेत्रात यश मिळविण्यात या काळात मदत होईल. आर्थिक लाभ, जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता निर्माण करत आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)