ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र म्हणजे सौंदर्य, प्रेम, कला आणि भौतिक सुखाचा कारक मानला जातो. याचं शुक्राचं गोचर तीन राशींना चांगलं फलीत देणारं ठरणाार आहे. प्रत्येक ग्राहाचं एका ठराविका काळाने विविध राशीत भ्रमण गोचर होत असतं आणि त्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना देखील दिसतो. यंदाचं हे शुक्राचं गोचर काही राशींसाठी चांगला .योग निर्माण करत आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊयात.
शुक्राचं गोचर तीन राशींमध्ये मालव्य योग आणणार आहे. नोव्हेंबरपासून या राशीच्या आयुष्यात भरभऱाटीचा काळ सुरु होणार आहे. यंदाची ही दिवाळी या तीन राशींच्या मंडळींना यशाची आणि सकारात्मकतेची राहणार आहे. त्यातील सर्वात पहिले रास आहे ती म्हणजे तूळ.
तूळ राशीच्या शुक्राचं गोचर लाभदायी ठरणार आहे. तुमच्या राशीत शुक्र मालव्य राजयोग घडवून आणणार असून तुम्हाला याचा सर्वाधिक फायदा होईल. कारण शुक्र स्वत: च्या म्हणजेच तूळ राशीतून राशीतून संक्रमण करणार आहे; ज्यामुळे तूळेच्या मंडळींचा कामे मार्गी लागतील. हे गोचर तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा आणेल, संपत्तीचा लाभ होईल आणि नवीन नोकरीची संधी चालून येईल. या दिवसात नातेसंबंध दृढ होऊ शकतात आणि भागीदारीत असलेल्यांना फायदा सुद्धा होऊ शकतो, असं एकंदरितच हा मालव्या योग तुळेच्या मंडळींसाठी समाधानकारक असणार आहे.
शुक्र गोचराचा फायदा मकर राशीला देखील सकारात्मक राहणार आहे. व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी कामात पदोन्नती, उच्च पद मिळण्याची शक्यता दिसते आहे. व्यवसायातही भरभराट होईल. अडकेले पैसे मिळतील किंवा अचानक आर्थिक लाभ होईल, नोकरी व्यवसायात वरिष्ठांकडून वेळोवेळी तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक रित्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती देखील या काळात चांगली राहणार आहे.
मालव्य राजयोग जुळून आल्यामुळे, धनु राशीची आर्थिक पिडा संपणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्य़ाचा हा उत्तम काळ आहेय या दिवसात आर्थिक स्थितीत लक्षणीय लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील आणि गुंतवणुकीतून नफा मिळेल. त्यांना अचानक पैसे मिळतील, शेअर्समधून नफा होईल. पैसे अडकले आहेत ते परत मिळवू शकतात. त्याचबरोबर चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे.