फोटो सौजन्य- pinterest
तांब्याच्या भांड्यांचा वापर सहसा आपण पूजेसाठी किंवा कोणत्याही खास प्रसंगी करतो. मात्र तुम्हाला हे माहीत आहेत का की, तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते पिणे केवळ आरोग्यापुरतेच नव्हे तर ग्रहांच्या प्रभावासाठी देखील फायदेशीर आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये तांब्याला खूप शुभ मानले जाते त्याचा संबंध सूर्य आणि बुध ग्रहाशी आहे. असे म्हटले जाते की, जर एखाद्या व्यक्तीने नियमितपणे तांब्याच्या भांड्यांचा योग्य वापर केला तर त्या व्यक्तीच्या नशिबात सकारात्मक बदल होताना दिसून येतात. तांब्याचे भांड आणि हिरवे मूग डाळीचा वापर आपल्याला सूर्य आणि बुध ग्रहाला बळकटी देण्यासाठी कसा उपयोगी ठरतो ते जाणून घ्या
रात्री तांब्याच्या भांड्यात किंवा ग्लासमध्ये पाणी ठेवून सकाळी ते पिणे खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे अनेक आजार बरे होण्यास मदत होते. त्यासोबतच मानसिक शांती देखील मिळते. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय सूर्य ग्रहाला बळ देतो. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य ग्रहाची स्थिती कमकुवत असते अशा लोकांमधील आत्मविश्वास, कामात अडथळे आणि थकवा यांसारख्या इतर समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने या समस्या हळूहळू कमी होऊ शकतात.
जर तुम्हाला नशिबाची साथ हवी असेल तर तुम्हाला हा उपाय करता येईल. तांब्याच्या भांड्यात हिरवी मूग डाळ घेऊन ती घराच्या पूर्व दिशेला म्हणजे ईशान्य कोपऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते. त्यानंतर त्यावर तांब्याचे झाकण ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे घरामधील सकारात्मक उर्जेत वाढ होते. त्यासोबतच सूर्य आणि बुध दोन्ही ग्रह बलवान बलवान देखील होतात. ज्या लोकांच्या घरामध्ये वारंवार समस्या येत असतात अशा लोकांनी हा उपाय करणे फायदेशीर ठरेल.
हिरवी मूग डाळीला शांती आणि संतुलनाचे प्रतीक मानले जाते. तांबे ऊर्जा शोषून घेते आणि तिचे सकारात्मक स्वरूपात रूपांतर करते. ज्यावेळी या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या जातात त्यावेळी ते आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात. असे म्हटले जाते की, हा उपाय केल्यास मन शांत राहते, राग कमी होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. त्यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी राहते.
तांब्याचे भांडे फक्त पूर्व दिशेलाच ठेवावे. ज्योतिषशास्त्रामध्ये पूर्व दिशा शुभ मानली जाते आणि ती सूर्याची दिशा देखील आहे. यामुळे या दिशेला तांब्याचे भांडे ठेवल्याने लवकर अपेक्षित ते फळ मिळते.
ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये बुध आणि सूर्य ग्रहाची स्थिती कमकुवत आहे.
ज्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे.
ज्या लोकांना कामामध्ये वारंवार अडथळे येत आहे.
ज्यांच्या घरात खूप तणाव आणि कलह असतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)