फोटो सौजन्य- istock
आपल्याला जीवनामध्ये कधीही असे दृश्य पाहायला मिळतात जे सामान्य नसतात. दृश्ये आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात आणि लोक त्याकडे श्रद्धेने पाहतात. यापैकी एक म्हणजे पांढरे घुबड दिसणे. असे म्हटले जाते की, घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे आणि पांढरे घुबड हे खूप शुभ आणि पवित्र मानले जाते. प्रत्येक लहान घटना देखील लोकांच्या धार्मिक भावनांशी जोडलेल्या असतात ज्याप्रमाणे कुठेही पांढरे घुबड दिसणे म्हणजे चर्चेचा विषय ठरतो. देवी लक्ष्मीला आशीर्वादाचे आणि येणाऱ्या चांगल्या काळाचे प्रतीक मानले जाते. पांढरे घुबड दिसण्याचा नेमका अर्थ काय आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, जाणून घ्या
भारतीय परंपरेनुसार घुबड हा एक विशेष पक्षी मानला गेला आहे. धार्मिक मान्यतेनुसार, घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन आहे आणि त्याचा संबंध संपत्ती, समृद्धी आणि आशीर्वादाशी असल्याचे म्हटले जाते. तसेच त्याला पवित्र देखील मानले जाते. असे मानले जाते की, ज्यावेळी एखाद्याला पांढरे घुबड दिसते त्यावेळी त्याच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न आहे असा समज आहे. लोकांच्या विश्वासानुसार, घुबड दिसल्यास कुटुंबामध्ये समृद्धी येते. त्यासोबतच व्यक्तीची प्रलंबित कामे देखील पूर्ण होतात.
पांढरे घुबड दिसल्यास ते शुभ मानले जात असल्याने देवी लक्ष्मीचे वाहन असल्यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे स्मरण करावे. मान्यतेनुसार, असे केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि चांगले परिणाम मिळतात. त्यासोबतच मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार आणू नये. देवी लक्ष्मीचे वाहन असलेल्या घुबडाला कधीही घाबरवू किंवा इजा करू नये तर त्याचा नेहमी आदर करावा. या गोष्टी करणे महत्त्वाचे मानले जाते.
जर घराजवळ किंवा मंदिराच्या परिसरात पांढरे घुबड दिसणे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला संपत्ती, विपुलता, आनंद आणि समृद्धी या गोष्टीशी यांचा संबंध येऊ शकतो. तर बरेच लोक देवाकडून मिळालेला संदेश असल्याचे देखील समजतात. असे देखील म्हटले जाते की, जीवनामध्ये नवीन सुरुवात होणार आहे.
वैज्ञानिकदृष्ट्या पाहिल्या गेल्यास पांढरे घुबड खूप दुर्मिळ आहेत. सहसा घुबड रात्री दिसतात आणि शांत ठिकाणी राहतात. परंतु जर दिवसा किंवा गर्दीच्या ठिकाणी पांढरे घुबड दिसले तर ते असाधारण मानले जाते. लोक याला एखाद्या महान शक्तीचे लक्षण मानतात. जरी विज्ञानाने याला एक नैसर्गिक घटना मानली असली तरी त्याला धार्मिक श्रद्धेत खूप खोलवर स्थान असल्याचे म्हटले गेले आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)