
फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार महादेवाचे नाव घेतल्याने मनावर एक अनोखी शांती येते. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने खऱ्या मनाने भगवान शिवाचे स्मरण केले तर त्यांचे सर्व त्रास हळूहळू कमी होऊ लागतात. म्हणूनच लोक शिवलिंगाला पाणी अर्पण करताना बेलपत्र अर्पण करुन महादेवाची पूजा केली जाते. पण खूप कमी लोकांना माहीत आहे की, शिवलिंगावर पाणी अर्पण करताना त्यामध्ये काही गोष्टी मिसळल्यस तुम्हाला फायदा होतो. पाण्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या मिसळून अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल देखील घडून येताना दिसून येतात. तर काहींना मानसिक ताण, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवलिंगाला योग्य पद्धतीने पाणी अर्पण केल्याने व्यक्तीची ऊर्जा शुद्ध होते आणि नकारात्मकता दूर होते. पाण्यामध्ये कोणत्या गोष्टी मिसळून शिवलिंगावर अर्पण करणे फायदेशीर असते, जाणून घ्या
जर तुमच्या घरात सतत भांडणे, चिडचिड किंवा नातेसंबंधांमध्ये वाढता तणाव जाणवत असल्यास शिवलिंगावर मध मिसळलेले पाणी अर्पण करावे. कारण मधाला नेहमीच गोडवा आणि शांतीचे प्रतीक मानले गेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार, मध हे महादेवांना शांत करतो आणि व्यक्तीमधील कटुता दूर करून मन हलके करतो. यामुळे नातेसंबंध अधिक गोड होतात, घरातील वातावरण शांत होते आणि मानसिक ताण कमी होतो हे फायदे देखील होतात.
गंगाजल हे सर्वात पवित्र मानले जाते. थोडेसे गंगाजल पाण्यात मिसळून ते शिवलिंगावर अर्पण केल्याने त्याचा प्रभाव सर्वांवर होताना दिसून येतो. यामुळे व्यक्तीभोवतीची नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. प्रत्येक कामातील अडथळे कमी होतात.
घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि कधीकधी अडकलेले पैसे वाहू लागतात हेदेखील फायदे होतात.
महादेवांना दूध खूप प्रिय आहे. जर तुम्ही कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल, तुमचे मन अस्वस्थ असेल किंवा तुम्हाला झोप येत नसल्यास पाण्यात थोडे दूध मिसळून शिवलिंगावर अर्पण करणे खूप फायदेशीर मानले जाते. लक्षात ठेवा की दूध जास्त थंड नसावे, थोडेसे घालणे पुरेसे आहे. आरोग्य सुधारणे, शांत आणि स्थिर मन राहणे, भीती आणि चिंता कमी होणे यांसारख्या समस्या दूर होतात.
जर वारंवार मेहनत करूनही तुमचे काम पूर्ण होत नसेल, पदोन्नती थांबली असेल, व्यवसाय चालू नसेल किंवा अचानक सर्व काही बिघडू लागले असेल, तर पाण्यात साखर मिसळून शिवलिंगाला अर्पण केल्याने आराम मिळतो. साखर सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि गोष्टी सुरळीत करते. रखडलेली कामे सुरू होतात, करिअरमध्ये प्रगती होते आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते हेदेखील फायदे होतात.
काळी मिरी खूप शक्तिशाली मानली जाते. जर तुमच्यावर कोणताही दबाव, वाईट नजर, अडथळा किंवा सततची समस्या असेल जी तुम्हाला समजतही नाही, तर काळीमिरीला पाण्यात टाकून शिवलिंगाला अर्पण करणे खूप प्रभावी मानले जाते. हा एक प्रभावी उपाय मानला जातो. लपलेले अडथळे दूर होतात, वाईट नजरेपासून सुटका होते, शत्रू आणि नकारात्मक उर्जेपासून संरक्षण होते. पाण्यातून काळी मिरी अर्पण केल्याने हेदेखील फायदे होतात.
पाणी नेहमी स्वच्छ ठेवा
थोड्या प्रमाणात साहित्य घाला
अर्पण करताना शांत मन ठेवा
घाई करू नका
सोमवार किंवा महाशिवरात्री हे सर्वोत्तम काळ मानले जातात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: सोमवारचा दिवस महादेवांना समर्पित आहे
Ans: शिवलिंगावर पाणी अर्पण करताना मध, साखर, गंगाजल, दूध, काळी मिरी
Ans: शिवलिंगावर या गोष्टी अर्पण केल्यास समस्या, अडथळे आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते